शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Phone Blast: 'या' सोप्या ट्रिक्स फॉलो करा, कधीच "ब्लास्ट" होणार नाही तुमचा Smartphone

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 5:37 PM

1 / 6
काही दिवसांपूर्वीच OnePlus आणि Realme चे स्मार्टफोन ब्लास्ट झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. अशा प्रकारची प्रकरणे यापूर्वीही अनेकदा समोर आली आहेत. स्मार्टफोन ब्लास्ट होण्याचा प्रकार कोणाच्याही बाबतीत घडू शकतो. पण, आज आम्ही तुम्हाला अशाच काही युक्त्या सांगणार आहोत, ज्या फॉलो केल्यास तुमचा स्मार्टफोन ब्लास्ट होण्यापासून वाचेल.
2 / 6
फिजीकल डॅमेज- तुमचा फोन अनेकदा हातातून निसटून खाली पडला असेल. फोन जमिनीवर पडल्यानंतर त्याची बॅटरी खराब होऊ शकते. एकदा बॅटरी डॅमेज झाली, की ती फुगते आणि त्यामुळेच फोनचा स्फोट होण्याची शक्यता वाढते. जर तुमचा फोन उंच ठिकाणाहून पडला असेल किंवा जोरात घसरला असेल तर तो ताबडतोब सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जा.
3 / 6
फोन थेट सूर्यप्रकाशात ठेवणे- स्मार्टफोनला जास्त वेळ सूर्यप्रकाशात ठेवू नका आणि दिवसा कारमध्ये सोडू नका असा सल्ला दिला जातो. अति उष्णतेचा फोनच्या बॅटरीच्या सेलवर परिणाम होतो आणि त्यातून ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडसारखे वायू तयार होतात. या वायूंमुळे बॅटरी फुगून त्याचा स्फोट होऊ शकतो.
4 / 6
दुसऱ्या कंपनीचे चार्जर वापरणे- फोनचा चार्जर हेदेखील फोनचा स्फोट होण्याचे एक प्रमुख कारण असू शकते. तुमचा स्मार्टफोन नेहमी कंपनीने दिलेल्या चार्जरने चार्ज करण्याचा प्रयत्न करा. जर तुमचा चार्जर बिघडला तर फक्त ब्रँडेड चार्जर खरेदी करा. थर्ड-पार्टी चार्जर तुमच्या फोनची बॅटरी खराब करू शकतात, ज्यामुळे फोनचा स्फोट होतो.
5 / 6
प्रोसेसरवर जास्त दबाव टाकू नका- तुमच्या फोनचा प्रोसेसर फोन जास्त गरम होण्याचे एक मोठे कारण आहे. त्यामुळे तुमच्या फोनवर भरपूर दबाव टाकणारे अॅप्स न वापरण्याचा प्रयत्न करा. शिवाय फोन चार्जिंगला लावला असताना त्याचा वापर टाळा. या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही फोनच्या प्रोसेसरवरील दबाव कमी करू शकता.
6 / 6
रात्री फोन चार्ज करणे- तुमचा स्मार्टफोन रात्रभर चार्ज करण्यासाठी कधीही सोडू नका. असे केल्याने फोन लवकर गरम होतो. आपल्यापैकी बरेच जण झोपेत असताना फोन चार्जिंगवर ठेवतात, परंतु यामुळे बॅटरी ओव्हरहिटींग, ओव्हरचार्ज, शॉर्ट-सर्किट आणि कधीकधी स्फोट देखील होऊ शकतो.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनBlastस्फोट