शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 17:12 IST

1 / 6
उष्णता वाढली काय की पावसाला सुरुवात झाली काय, मच्छर काही पाठ सोडत नाही. मच्छरांचे थवेच्या थवे घराच्या दिशेने येऊ लागतात. खिडकी असे किंवा दरवाजा किंवा बाथरूम, बेसिनचा पाईप... सगळ्यातून एकेक करून घरात घुसतात. त्यांना मारण्यासाठी तुम्ही कॉईल काय, स्प्रे काय आणि काय काय... उपाय करता. आता हे सर्व उपाय बाजुला पडणार आहेत. कारण मच्छर मारायची एअर डिफेन्स सिस्टीमच आली आहे.
2 / 6
एक असे लेझर डिव्हाईस आले आहे जे तुमच्या घरातील, घराबाहेर लावले तर तेथील मच्छर एका क्षणात मारणार आहे. डास अनेक प्रकारचे जिवघेणे आजार पसरवतात. त्यापासून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे. फोटॉन मॅट्रीक्स असे या एअर डिफेन्स सिस्टीमचे नाव आहे. जे तुम्हाला घराच्या भिंतीवर किंवा घरातील एखाद्या जागेवर, टेबलवर ठेवता येणार आहे.
3 / 6
आता हे चीनने बनविलेले असले तरी ते खूप फायद्याचे आहे. कारण तुम्हाला कॉईलच्या धुरापासून, रॅकेट हातात घेऊन मारण्यापासून ते मच्छर दूर ठेवणारी क्रिम लावण्यापासून सुटका करून देणार आहे. या डिव्हाईसमध्ये LiDAR या एकप्रकारच्या रडारचा वापर करण्यात आला आहे. या डिव्हाईसच्या व्हेव्हजना मच्छर आल्याचे समजताच ते लेझर लाईटद्वारे त्या मच्छरवर हल्ला करणार आहे.
4 / 6
हे डिव्हाईस दर सेकंदाला ५०००० स्कॅन करणार आहे. यामुळे एखादा मच्छर याच्या कचाट्यातून सुटणे दुरापास्तच होणार आहे. तुम्ही हे उपकरण खोलीत बसवा किंवा घराबाहेर ते काम करते. एका सेकंदाला ३० डास हे उपकरण मारू शकते एवढा त्याचा वेग आहे. अंधारातही हे डिव्हाईस चांगल्या प्रकारे काम करते.
5 / 6
या डिव्हाईसची दोन मॉडेल आहेत, एक बेसिक आहे जे ९.८ फूट एवढ्या दूरवरील मच्छरांना स्कॅन आणि मारू शकते. हे डिव्हाईस त्याच्या पुढच्या भागाच्या ९० डिग्री एवढा एरिया टार्गेट करू शकते.
6 / 6
यामध्ये सध्या एकच कमतरता आहे ती म्हणजे एखादी माशी किंवा मच्छर खूपच वेगाने म्हणजे एका सेकंदात १ मीटर (३.३ फूट) पेक्षा जास्त वेगाने उडत असेल तर ते त्या डासाला मारू शकत नाही. म्हणजेच हे डिव्हाईस इतर किटकांवर वापरता येणार नाही. मच्छर किंवा माशी एवढ्या वेगाने उडण्याची शक्यता कमी असते.
टॅग्स :chinaचीन