शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; रिचार्जच्या किमती पुन्हा वाढणार..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 20:12 IST

1 / 8
Mobile Recharge Plan: भारतातील कोट्यवधी स्मार्टफोन्स युजर्सना मोठा धक्का बसू शकतो. गेल्या वर्षी खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढवल्या होत्या.
2 / 8
यामुळे युजर्सनी तीव्र नाराजीही व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा कंपन्या आपल्या रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवू शकते.
3 / 8
मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या (जिओ, एअरटेल आणि व्हीआय) या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती आणखी वाढवू शकते.
4 / 8
यामुळे प्रीपेड आणि पोस्टपेड, दोन्ही युजर्सना जास्त पैसे मोजावे लागू शकतात. याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होईल.
5 / 8
ब्रोकरेज फर्म बर्नस्टाईनच्या अहवालानुसार, ही टॅरिफ वाढ दीर्घकालीन रणनीतीचा एक भाग आहे. कंपन्यांचा असा विश्वास आहे की, यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल आणि नेटवर्क सुधारण्यासही मदत होईल.
6 / 8
विशेष म्हणजे, गेल्या वर्षी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे प्लॅन महाग केले होते, त्यावेळी कंपन्यांनी कारण दिले होते की, युजर्ससाठी 5G सेवा सुरू केल्यानंतरही प्लॅनच्या किमती वाढवल्या गेल्या नाहीत.
7 / 8
म्हणूनच आता किमती वाढवणे आवश्यक आहे. आता पुन्हा एकदा कंपन्यांनी किमती वाढवल्या, तर युजर्सना मोठा धक्का बसू शकतो.
8 / 8
मिळालेल्या माहितीनुसार, 5जी नेटवर्कच्या विस्तारामुळे आणि तांत्रिक खर्चामुळे कंपन्यांना मोठी गुंतवणूक करावी लागत आहे. स्पेक्ट्रम खरेदी करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी खूप पैसा खर्च केला जात आहे. अशा परिस्थितीत आता कंपन्या या सर्व गोष्टींचा भार ग्राहकांवर टाकण्याची तयारी करत आहेत.
टॅग्स :AirtelएअरटेलJioजिओVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)Smartphoneस्मार्टफोन