शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आयटेलचा ए ९० : परवडणाऱ्या किंमतीतील AI आयवाना असलेला स्मार्टफोन, कसा आहे; फिचर्स काय...

By हेमंत बावकर | Updated: May 29, 2025 12:41 IST

1 / 9
आयटेल या कंपनीने त्यांचा A90 हा स्मार्टफोन भारतात नुकताच लाँच केला आहे. परवडणाऱ्या किंमतीत असला तरी त्यात एआय आणि कॅमेरासह अन्य फिचर्स देण्यात आले आहेत. आम्ही बराच काळ हा फोन वापरला असून डिस्प्ले, बॅटरी, कॅमेरा आणि परफॉर्मन्स आदी जाणून घेऊया...
2 / 9
सर्वात पहिला म्हणजे या फोनचा लुक, स्लीम, मध्यम वजनाचा आणि मागे तीन कॅमेरांचे सेटअप देण्यात आलेला आहे. 6.67 डिस्प्ले उन्हात बऱ्यापैकी ब्राईट आहे. ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह एचडी+ डिस्प्ले, १८० हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट असल्याने कुठेही समस्या येत नाही.
3 / 9
उजव्या बाजुला व्हॉल्युम बटन, फिंगरप्रिंट स्कॅनर असून डाव्या बाजुला सिमकार्ड ट्रे आहे. खालच्या बाजुला ३.५ एमएम जॅक आणि टाईप सी चार्जिंग पोर्टसह पलिकडे स्पीकर ग्रील देण्यात आली आहे. स्पीकरचा आवाज थोडा ठीक आहे. किंमतीच्या मानाने ठीक आहे.
4 / 9
या फोनमध्ये डायनामिक बार देण्यात आला आहे. त्यावर लाईव्ह अलर्ट दिसतात. डिस्प्लेही किंमतीच्या मानाने ठीकठाक आहे. यामध्ये UNISOC T7100 प्रोसेसर देण्यात आला आहे. अॅप्स सुरु होताना थोडा वेळ लागतो, परंतू एकदा का लोड झाले की फास्ट सर्फिंग करता येते. त्यामुळे काही समस्या येत नाही.
5 / 9
कॅमेरा: या फोनचा कॅमेरा सेटअप आकड्यांत कमी वाटत असला तरी चांगला आहे. पाठीमागे १३ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. तर पुढे ५ मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. याचे सॅम्पल आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. पाठीमागचा कॅमेरा स्मार्ट आहे, म्हणजेच एखाद्या फुलाचा फोटो काढत असाल तर तो ते ओळखून तुम्हाला त्या मोडवर नेतो. व्यक्तीचा असेल किंवा अन्य कोणत्या वस्तू इमारतीचा तसा सेट्अप आपोआप करून तुम्ही फोटो काढू शकता. सेल्फी कॅमेरादेखील चांगले डिटेल्स देणारे फोटो क्लिक करतो.
6 / 9
१ का सेकंदाच्या आत फिंगरप्रिंट स्कॅन होते. तसेच फेस अनलॉकदेखील लगेचच डिटेक्ट होते. एवढ्या कमी किंमतीत इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देता येत नसला तरी यामुळे फोनचा अॅक्सेस करणे सोपे झाले आहे. पावसातही आरामात हा फोन वापरता येत होता.
7 / 9
४ जीबी (८ जीबी रॅम एक्सपान्शन), ६४ जीबी / १२८ जीबी स्टोरेज अशा सेटअपमध्ये हा फोन येतो. तसेच २ टीबी पर्यंत वाढवता येणारी मेमरी यामुळे हा फोन मर्यादीत राहिलेला नाही. आम्ही जवळपास ४० च्या वर अॅप या फोनमध्ये इन्स्टॉल केली होती. एवढा लोड असूनही फोन लॅग किंवा फार स्लो झाला नव्हता. शिवाय या फोनमध्ये धूळ आणि वॉटर रेझिस्टंटसाठी IP54 प्रोटेक्शन देण्यात आलेले आहे.
8 / 9
महत्वाची लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे या फोनमध्ये ४ जी क्षमता आहे. १५W फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली ५०००mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी पूर्ण चार्ज होण्यासाठी दोन तास घेते व दीड ते दोन दिवस आरामात पुरते. कॅमेरा वापरताना किंवा बराच वेळ व्हिडीओ पाहताना हा फोन जास्त गरम नाही.
9 / 9
एआय असिस्टंट - आयवाना २.० यात देण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार तुमच्या शब्दावरून व्हॉट्सअप ऑडिओ व्हिडीओ कॉल करू शकतो. एखादे अॅप ओपन करू शकतो. तुमच्या कॉन्टॅक्टमधील व्यक्तींना फोन करू शकतो. हे फिचर्स आम्ही वापरून पाहिले. व्हॉट्सअप कॉल काही लागू शकला नाही, कधी नावांचे स्पेलिंग चुकीचे घ्यायचा कधी बरोबर घेतले तर ते कॉन्टॅक्ट व्हॉट्सअप लिस्टमध्ये नाही असे सांगायचा. परंतू, नॉर्मल कॉल लागत होते. यामध्ये थोडी अपडेटची गरज वाटली.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन