iPhone 16e Review: अॅपल भारतात तगडी प्लॅनिंग करतेय, उर्दूसह १० भाषांत आणलाय iPhone; बॅटरी तर एवढी जबरदस्त दिलीय...
By हेमंत बावकर | Updated: March 18, 2025 14:50 IST
1 / 11अॅपल या जगविख्यात कंपनीने भारतात त्यांचा सर्वांसाठी आणलेला iPhone 16e लाँच केला आहे. कधी नव्हे तेवढी जास्त काळ येणारी बॅटरी, अॅपल इंटेलिजन्स आणि जवळपास १० भाषांमध्ये हा फोन उपलब्ध करण्यात आला आहे. एका कॅमेराचा जोरावर अॅपलने पूर्ण भारत कॅप्चर करायचे ठरविले आहे. अॅपलच्या इतर फोनच्या तुलनेत साधा फोन असला तरी तो हे करू शकेल का, आम्ही हा फोन गेले तीन आठवडे वापरला, कसा वाटला...2 / 11अॅपल हा छोटा iPhone 16e फोन कमी किमतीत आणेल असे वाटत होते. परंतू, याची किंमत थोडी नाही बरीच जास्त आहे म्हणजे 59,900 रुपये. SE ची जागा हा फोन घेऊ शकणार नाही एवढी. सिंगल कॅमेरा लेन्स आणि हा एक ड्रॉबॅक वगळला तर बाकी अनेक गोष्टी या फोनमध्ये आहेत. उलट अॅपलने युजरची एक सर्वात मोठी भीती जी बॅटरी बॅकअपची होती ती काढून टाकली आहे. अॅपल १६ ई ची बॅटरी सामान्य वापरासाठी अडीच दिवस पुरते, मध्यम वापर असेल तर दोन आणि त्यापेक्षा जास्त वापर असेल तर दीड दिवस ही बॅटरी येते. यामध्ये आम्ही कॅमेरा, म्युझिक, इंटरनेट, व्हॉट्सअप, युट्यूब व्हिडीओ आदी गोष्टी वापरून पाहिल्या. यात बॅटरी एक मोठा बदल वाटला आहे.3 / 116.1 इंचाचा सुपर रेटिना XDR आणि OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर स्मूथ आणि क्लिअर व्हिडीओ पाहता येतात. डिस्प्ले साईज आवाक्यात असल्याने हातात आरामात मावतो. यामुळे महिलांसाठी हा फोन चांगला ठरू शकतो. 1,200 निट्स ब्राईटनेसमुळे तुम्ही आताच्या तळपत्या उन्हातही तो आरामात वापरू शकता. स्पीकर्सचा आवाज चांगला दणकट आहे. यामुळे कॉल स्पीकरवर ठेवताना किंवा मोठ्या आवाजात गाणी ऐकताना सावध राहिलेले चांगले.4 / 11पाण्यापासून वाचण्यासाठी IP68 रेटिंग आहे. आणखी एक मोठा बदल म्हणजे अॅपलने या फोनमध्ये टाईप-सी पोर्ट दिला आहे, जो आता सर्व अँड्रॉईड फोनमध्ये वापरला जात आहे. फोन सायलेंट करण्यासाठी एक वेगळे बटन दिलेले आहे. बाकी सर्व नेहमीचेच आहे. पाठीमागे 48 मेगापिक्सल कॅमेरा आणि त्याच्या बाजुला फ्लॅश दिलेला आहे. 5 / 11कॅमेराबाबत बोलायचे झाले तर चांगल्या प्रकाशात हा फोन चांगल्या क्वालिटीचे फोटो काढतो. नॅचरल टोन येतात. परंतू लो लाईटमध्ये थोडे ब्लॅक स्पॉट येतात. किंमतीच्या मानाने कॅमेरा पाहता यात इम्प्रूव्हमेंट होणे गरजेचे आहे. ऑप्टिकल इमेज स्टॅबिलाइजेशन, हाईब्रिड फोकस पिक्सल आणि सुपर हाई रिजॉल्यूशन सारखी फिचर यात आहेत. बाय डिफॉल्ट कॅमेरा २४ मेगापिक्सल फोटो क्लिक करतो. ४८ मध्येही करता येतात. १० एक्स ऑप्टिकल झूम आणि नाईट मोडही यात दिलेला आहे. शिवाय पोर्ट्रेट मोडमध्ये देखील याच कॅमेरा सेन्सरद्वारे फोटो काढता येतात. सेल्फीसाठी १२ मेगापिक्सलचा TrueDepth सेन्सर आहे जो ठिकठाक फोटो क्लिक करतो.6 / 11या कॅमेराद्वारे ४ के व्हिडीओ शूट करता येतात. तसेच व्हिडीओ सुरु असताना ८ मेगापिक्सल रिझोल्युशनचे फोटोही काढता येतात. व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी एक भन्नाट फिचर देण्यात आले आहे. जर तुम्ही गजबजाटात असाल आणि तुम्ही ज्या व्यक्तीचा व्हिडीओ शूट करताय तो बोलत असेल तर तुम्ही त्याच्यावर फोकस केला की फक्त त्याचाच आवाज रेकॉर्ड होतो. आजुबाजुच्या लोकांचा गोंगाट मुळीच ऐकायला मिळत नाही.7 / 11अॅपलने यामध्ये iPhone 16 चा A18 चिपसेट दिलेला आहे. जो अॅपल इंटेलिजन्स, चॅट जीपीटी आदी वापरू शकतो. अॅप्स टू अॅप्समध्ये जात असताना कुठेही लॅग जाणवत नाही. उच्च क्वालिटीचे व्हिडीओ पाहताना तसेच अन्य कामे करत असताना स्मूथ फंक्शनिंग होते. फेस आयडी या फोनमध्ये देण्यात आले आहे. जे काही सेकंदात तुमचा चेहरा ऑथेंटिकेट करते आणि पुढे वापरास परवानगी देते. Apple Intelligence आम्हाला दाखविलेल्या फोनमध्ये जरी असले तरी वापरत असलेल्या 16e मध्ये सध्या उपलब्ध नाही, ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध केले जाऊ शकते. 8 / 11Apple Intelligence आम्ही जेव्हा वापरले तेव्हा Genmoji नावाचे एक फिचर त्यात होते, जे तुम्हाला हवे तसे इमोजी तुम्ही बनवू शकता. एखादा प्राणी किंवा शेफ किंवा अन्य काही व्यक्तीरेखा टाकली तर तुम्हाला इमोजी तयार मिळणार आहे. याचबरोबर नोट्समध्ये चॅट जीपीटी इंटिग्रेट केले आहे. तुम्ही एखादा विषय निवडला तर त्यावर तुम्हाला भला मोठा लेख तयार मिळणार आहे. 9 / 11Visual Intelligence हे फिचर Action Button ला मिळणार आहे. ज्यावरून तुम्ही कोणत्याही वस्तूवर कॅमेरा रोखला तर त्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे. गुगल लेन्ससारखेच हे काम करणारे आहे. 10 / 11अॅपलचा भारतातील विविध भाषांतील लोक कॅप्चर करण्याचा प्लॅन आहे. जवळपास १० भाषा यामध्ये वापरता येणार आहेत. यामध्ये उर्दू देखील दिलेली आहे, जी उलटी लिहीली जाते अगदी तसाच त्याचा सेटअप असणार आहे. याशिवाय वेगवेगळ्या भाषा यात वापरता येणार आहेत. 11 / 11Apple 16e जर मध्यम वर्गासाठी आणला असेल तर जास्त किंमत हा थोडा चिंतेचा विषय ठरू शकतो. बाकी कॅमेरा, फरफॉर्मन्स आणि आयफोन हवा अशा इच्छुकांसाठी हा फोन चांगला पर्याय आहे. ज्यांना अपग्रेड करायचे आहे त्यांच्यासाठीही हा फोन चांगला पर्याय ठरू शकतो.