लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 15:04 IST
1 / 8भारत आता अंतराळातील आपल्या उपग्रहांना बाहेरच्या शक्तीच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी एका नवीन योजनेवर काम करत आहे. या योजनेचा उद्देश शत्रूच्या उपग्रहांकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यांना रोखणे आहे. काही दिवसापूर्वी एक संशयास्पद उपग्रह भारतीय उपग्रहाच्या जवळून गेले आहे, यामुळे आता हे पाऊल उचलण्यात आले आहे.2 / 8भारत आता अंतराळातील आपल्या उपग्रहांना बाहेरच्या शक्तीच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी एका नवीन योजनेवर काम करत आहे. या योजनेचा उद्देश शत्रूच्या उपग्रहांकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यांना रोखणे आहे. काही दिवसापूर्वी एक संशयास्पद उपग्रह भारतीय उपग्रहाच्या जवळून गेले आहे, यामुळे आता हे पाऊल उचलण्यात आले आहे.3 / 8मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार असे 'बॉडीगार्ड' उपग्रह विकसित करण्याची तयारी करत आहे. हे भारतीय उपग्रहांना कक्षेत फिरवू शकतील, धोक्यांपासून त्यांचे संरक्षण करू शकतील आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली शोधू शकतील. 4 / 8२०२४ च्या मध्यात, एका शेजारील देशातील उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) उपग्रहाच्या फक्त एक किलोमीटर अंतरावरून गेला. हा उपग्रह पृथ्वी निरीक्षण आणि मॅपिंगसारखी कामे करत होता, याचा वापर संरक्षण क्षेत्रात देखील केला जातो.5 / 8उपग्रहांची टक्कर झाली नाही, पण हा योगायोग नसल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. हे शक्तीप्रदर्शन होते असा दावा त्यांनी केला. दुसरा देश अंतराळात आपली शक्ती दाखवू इच्छित होता. या घटनेने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या संभाव्य धोक्यावर भर दिला. इस्रो आणि अंतराळ विभागाने या घटनेवर अधिकृतपणे भाष्य केलेले नाही.6 / 8उपग्रह सुरक्षा प्रकल्पांतर्गत, भारताचे अंतराळ सुरक्षा पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पांतर्गत, अंदाजे २७,००० कोटी खर्चाचे ५० पाळत ठेवणारे उपग्रह प्रक्षेपित केले जातील. पहिला उपग्रह पुढील वर्षी प्रक्षेपित होण्याची अपेक्षा आहे. चीन आणि पाकिस्तानशी दीर्घकाळापासून सीमा वाद आहेत आणि या देशांकडे अंतराळ क्षमता वेगवेगळ्या पातळीवर आहेत. पाकिस्तानकडे फक्त आठ उपग्रह आहेत, तर भारताकडे शंभराहून अधिक उपग्रह आहेत. या बाबतीत चीन आघाडीवर आहे, चीनकडे ९३० हून अधिक उपग्रह आहेत.7 / 8'चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) अंतराळात धोकादायकपणे आपली उपस्थिती वाढवत आहे', असे भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितले आहे. 'चीनच्या अंतराळ कार्यक्रम केवळ वेगवान होत नाहीत तर ते अत्यंत प्रगत देखील होत आहेत, असेही जूनमध्ये एका चर्चासत्रात एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी असेही म्हटले होते. 8 / 8भारत सरकार आता स्टार्टअप्ससोबत काम करत आहे. जेणेकरून वेळेवर धोके ओळखता येतील अशा उपाययोजना शोधता येतील. संभाव्य धोके लगेच ओखळण्यासाठी उपगृहाची तयारी सुरू आहे. कोणतीही संभाव्य धोके त्वरित ओळखू शकतात, यामुळे जमिनीवरील तंत्रज्ञ वेळेत उपग्रहाचा मार्ग बदलू शकतात.