1 / 10जपान सौरऊर्जेपासून अंतराळात वीज निर्माण करणार असून, ती तारांशिवाय पृथ्वीवर पाठवणार आहे. जपानने हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्यामुळे हे शक्य होईल.2 / 10या तंत्रज्ञानामध्ये उपग्रह सूर्यप्रकाशाचे विजेमध्ये रूपांतर करून मायक्रोवेव्हच्या रूपात पृथ्वीवर पाठवेल आणि विशेष अँटेनाद्वारे वीज उपलब्ध होईल.3 / 10जपान अंतराळ प्रणालीने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाला 'ओहिसामा' (सूर्याचे जपानी नाव) असे नाव देण्यात आले आहे. 4 / 10प्रकल्पांतर्गत १८० किलो वजनाचा उपग्रह २२ स्क्वेअर फूट सौर पॅनेलसह उपग्रह लवकरच अवकाशात पाठवला जाईल.5 / 10पॅनेल सूर्यप्रकाशाची मदत घेत बॅटरी चार्ज करेल. शास्त्रज्ञांच्या मते, हा उपग्रह सुमारे ४०० किमी उंचीवरून सध्या एक किलोवॅट वीज पाठवणार आहे.6 / 10सध्या याची केवळ चाचणी घेण्यात येत आहे. अमेरिकेने २०२० मध्ये असाच प्रयोग केला होता; परंतु जास्त खर्चामुळे हा प्रकल्प पुढे नेला नाही.7 / 10सामान्य सौर पॅनेलमध्ये सूर्याची ऊर्जा विजेतरूपांतरित होते व तारांद्वारे पाठविली जाते; परंतु अंतराळातून पाठवलेली वीज मायक्रोवेव्हमध्ये रूपांतरित केली जाईल आणि वायरलेस पद्धतीने आणली जाईल.8 / 10या तंत्रज्ञानाचा उद्देश सूर्याच्या ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे हा आहे. यामुळे पृथ्वीवर स्वच्छ आणि अक्षय ऊर्जेचा पुरवठा वाढवता येणार आहे, असे संशोधकांनी माहिती देताना सांगितले.9 / 10जपान अंतराळ प्रणालीने (जेएसएस) उपग्रहाच्या प्रक्षेपणाची तारीख जाहीर केली नसली तरी अहवालानुसार तो एप्रिलनंतर लाँच केला जाऊ शकतो, असे संशोधकांनी सांगितले.10 / 10अंतराळातून वीज मिळविण्यासाठी ६०० स्क्वेअर मीटर क्षेत्रात १३ रिसीव्हर्स तयार करण्यात आले आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास वीज साठवणुकीची क्षमता वाढणार आहे.