शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

विंडो AC असो किंवा स्प्लिट... AC चा रंग नेहमी पांढरा का असतो माहित्येय का? जाणून घ्या यामागचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 14:46 IST

1 / 6
तुम्ही घरात लावलेल्या एसी असो किंवा मग ऑफिसमध्ये लावलेला एसी असो सर्व एसीमध्ये एक गोष्ट समान असते. मग विंडो एसी असो किंवा मग स्प्लिट एसी. दोन्ही एसीमध्ये रंग ही समान गोष्ट असते.
2 / 6
एसीचा रंग नेहमीच पांढरा असतो हे तुमच्या लक्षात आलंच असेल. त्यामुळे असे का होतं आणि बहुतांश एसीचा रंग पांढराच का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यामागचं कारण जाणून घेऊयात.
3 / 6
एसीचा रंग पांढरा का असतो हे जाणून घेण्याआधी एसीच्या युनिट्सबद्दल माहिती घेऊयात. एसीचे दोन युनिट्स असतात. पण विंडो एसीमध्ये फक्त एक युनिट असतं जे खिडकीच्या बाहेरी बाजूस जोडलं जातं. पण स्प्लिट एसीमध्ये, एक युनिट खोलीत असतं आणि एक युनिट घराबाहेर लावलेलं असतं. अशा परिस्थितीत, बाहेरील युनिट नेहमी पांढऱ्या रंगाचं असतं, तर आतील युनिटला कधीकधी डिझाइन किंवा इतर रंग पाहायला मिळतात.
4 / 6
एसीच्या मशीनचा रंग पांढरा असण्याचं कारण म्हणझे हा रंग कमी सूर्यप्रकाश शोषून घेतो. पांढरा आणि कोणताही फिकट रंग उष्णता परावर्तित करतात. त्यामुळे युनिट जास्त गरम होत नाहीत. पांढरा रंग दिल्यामुळे एसीमध्ये बसवलेल्या कॉम्प्रेसरसारख्या मशीनमध्ये निर्णाण होणाऱ्या उष्णतेमुळे कोणतीही अडचण येत नाही.
5 / 6
याच कारणामुळे एसीचे बाहेरील युनिट्स हे नेहमी पांढऱ्या रंगाचे असतात. वास्तविक, पांढरा रंग नेहमी थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहून एसीचं संरक्षण करतो. बहुतांश कंपन्या एक खास पांढरा रंग बनवत आहेत, जो एसीच्या युनिटाला दिल्यामुळे मशिनचं अधिक संरक्षण होऊ शकेल.
6 / 6
त्यामुळे पांढरा रंग किती महत्त्वाचा आहे, याचा अंदाज बांधता येऊ शकेल, कारण आता कंपन्याही पांढऱ्या रंगाचे खास पेंट बनवत आहेत. पांढऱ्या रंगाचा वापर उष्णता टाळण्यासाठी केला जातो असे म्हणता येईल. याशिवाय, इनडोअर युनिट देखील पांढरे आहेत कारण ते प्रत्येक रंगाशी जुळतात. मात्र, आता इनडोअर युनिटमध्ये वेगळा रंग किंवा डिझाइन वापरण्यात येत आहे.
टॅग्स :technologyतंत्रज्ञान