CoronaVirus: स्मार्टफोन वापरताय! तो साफ करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 17:08 IST
1 / 10जगातील बऱ्याच देशांमध्ये कोरोना संक्रमणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये, तसेच घरातच स्वच्छ आणि वारंवार हात धुवावेत, असाही सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात आपला स्मार्टफोनला देखील स्वच्छ करणे खूप आवश्यक आहे. स्मार्टफोनची कशा पद्धतीनं स्वच्छ कराल यासंदर्भात माहिती देत आहोत.2 / 10स्मार्टफोन किंवा कोणतेही गॅझेट साफ करण्यापूर्वी त्यातील बॅटरी आणि केबल काढणे आवश्यक आहे, अन्यथा यामुळे डिव्हाइसमध्ये ब्लास्ट होण्याचा धोका संभवतो.3 / 10स्मार्टफोन साफ करताना, हेडफोन जॅकसारख्या ओपन भागावर थेट सॅनिटायझर टाकू नका, अन्यथा ते आपला फोन खराब करू शकते.4 / 10हेडफोन जॅक चांगल्या फडक्यानं पुसून घ्या...5 / 10फोनचा डिस्प्ले पुसण्यासाठी लेन्स क्लिनरसारख्या मऊ कापडाचा वापर करा.6 / 10तसेच मोबाइल स्क्रीन पुसताना ताकदीनं त्यावर जोर देऊ नका, त्यामुळे स्क्रॅच पडण्याची शक्यता असते. 7 / 10मोबाईल साफ करण्यासाठी फक्त जंतुनाशक वाइप्सचा वापर करा, ज्यात कमीत कमी 70% आयसोप्रोपिल अल्कोहोल आहे.8 / 10मोबाइल क्लीन करण्यासाठी वाइप्स चांगले ठरतात..9 / 10आपण स्मार्टफोनला पुसल्यानंतर कोरडा होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवा, त्यानंतर काही वेळानं मोबाइल सुरू करा, 10 / 10मोबाइल स्वच्छ केल्या केल्या सुरू केल्या मोबाइलचा स्फोट होण्याचा धोका असतो. म्हणून कायम लक्षात ठेवा की, जेव्हा स्मार्टफोन पूर्णपणे कोरडे होईल, तेव्हा तो सुरू करा.