1 / 16कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. देशात कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे घरामध्ये इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर हा मोठ्याप्रमाणात केला जात आहे. 2 / 16अनेक जण गेम खेळण्यासाठी, व्हिडीओ पाहण्यासाठी, फोन करण्यासाठी सध्या स्मार्टफोनचा अधिक वापर करत आहे. मात्र स्मार्टफोन युजर्सनाही कोरोनाचा धोका असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.3 / 16रायपूर येथील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांच्या एका गटाने कोरोना साथीच्या काळात आरोग्य केंद्रांमध्ये मोबाईल वापराबाबत इशारा दिला आहे. 4 / 16मोबाईलसारखी उपकरणं ही कोरोना व्हायरसचे वाहक होऊ शकतात. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना व्हायरसची लागण होण्याची शक्यता असल्याची माहिती आता समोर आली आहे.5 / 16बीएमजे ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये एका लेखात डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईलचा संपर्क हा थेट चेहरा किंवा तोंडाशी असतो. जरी हात धुतले असले तरी ते धोकादायक असतं. 6 / 16प्रत्येक आरोग्य कर्मचारी 15 मिनिटं ते दोन तासात त्यांचा फोन वापरत असतात असं एका अभ्यासातून समोर आल्याची माहितीही देण्यात आली आहे. 7 / 16जागतिक आरोग्य संघटना आणि सीडीसी सारख्या आरोग्य संघटनांनीसुद्धा अनेक आदेश दिले आहेत. 8 / 16मोबाईलच्या वापराबाबत कोणताच उल्लेख यामध्ये नाही. WHO ने कोरोनाला रोखण्यासाठी दिलेल्या नियमावलीतही हे सांगितलेलं नाही असं देखील जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात म्हटलं आहे. 9 / 16आरोग्य केंद्रांमध्ये फोनचा वापर इतर कर्मचाऱ्यांशी संपर्क आणि संवादासाठी, औषधं शोधण्यासाठी तसंच इतर गोष्टींची माहिती घेण्यासाठी केला जातो असं कागदपत्रांमध्ये म्हटलं आहे. 10 / 16डॉक्टर विनित कुमार पाठक, सुनील कुमार पाणिग्रही, डॉ. एम मोहन कुमार, डॉक्टर उत्सव राज आणि डॉक्टर करपागा प्रिया पी यांनी जर्नलमधील लेख लिहिला आहे.11 / 16चेहऱ्याशी थेट संपर्कात येण्यामध्ये मास्क, कॅप आणि चश्म्यानंतर मोबाईलचा क्रमांक लागतो. इतर तीन गोष्टींची स्वच्छता करतो तशी मोबाईलची होत नाही. त्यामुळे फोनपासून संसर्गाचा धोका आहे असं लेखात म्हटलं आहे.12 / 16सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार मोबाईल फोन, काउंटर, टेबलचा वरचा भाग, दरावाज्याच्या कड्या, शौचालयातील नळ, की बोर्ड यांना सर्वाधिक वेळा स्पर्श केला जातो. त्यामुळे अशा ठिकाणी संसर्गाचा धोका असतो. 13 / 16रुग्णालयात मोबाईल फोनच्या स्वच्छतेसह त्याच्या योग्य वापराची मागणी डॉक्टरांनी या लेखामधून केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.14 / 16नवी दिल्लीतील एम्समधील रेसिडेट डॉक्टर्स असोसिएशनचे महासचिव डॉक्टर श्रीनिवास राजकुमार टी यांनी आरोग्य केंद्रांच्या बाहेरसुद्धा मोबाईलच्या वापराबाबत लक्ष देणं गरजेचं आहे. कारण तो सर्व ठिकाणी घेऊन जातात असं म्हटलं आहे. 15 / 16कोरोना व्हायरस हा स्मार्टफोनवर जिवंत राहू शकत असल्याची माहिती ही याआधीही रिसर्चसमधून समोर आली आहे. त्यामुळे काळजी घेणं महत्त्वाचं आहे.16 / 16फक्त स्मार्टफोनच नाही तर स्मार्टवॉच, टॅबलेट किंवा लॅपटॉपसारख्या ग्लास सर्फेस असलेल्या उपकरणांवर देखील कोरोना जिवंत राहू शकतो. यासाठी स्मार्टफोन हा वेळोवेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे.