शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 10:40 IST

1 / 8
सध्या मोबाईल रिचार्ज खूपच महाग झाले आहे. महिन्याला एक सिमकार्ड सुरु ठेवायचे असेल तर तुम्हाला २५० ते ३५० रुपयांचे रिचार्ज करावेच लागत आहे. ते करूनही तुम्हाला फोन आल्यावर ना धड ऐकायला येत, ना धड फोन लागत ना धड इंटरनेट स्पीड मिळत. अनेकांकडे दोन दोन सिमकार्ड आहेत. अशांनी तर पाचशेची एक नोटच बाजुला ठेवावी, असे सध्याचे दिवस आहेत. अशातच बीएसएनएलच काय तो एकमेव दिलासा आहे.
2 / 8
बीएसएनएलची सेवा तशी खराबच आहे. परंतू, जर तुम्हाला सिमकार्ड सुरु ठेवायचे असेल किंवा तुम्ही ऑफिस किंवा घरच्या वायफायमध्ये सारखे राहत असाल तर बीएसएनएलमध्ये तुमचा एअरटेल, जिओ किंवा व्होडाफोनचा नंबर पोर्ट करणे फायद्याचे आहे. याची दोन कारणे आहेत.
3 / 8
एक म्हणजे बीएसएनएल लवकरच फाईव्ह जी लाँच करणार आहे. आणि दुसरे म्हणजे बीएसएनएलच्या केवळ 897 रुपयांच्या रिचार्जवर तुम्ही सहा महिने आरामात काढू शकणार आहात. इतर कंपन्या तुम्हाला फारतर तीन महिनेच व्हॅलिडीटी देऊ शकतात.
4 / 8
BSNL ने आपल्या पोस्टमध्ये या प्लॅनची माहिती दिली आहे. एकदा रिचार्ज केले की तुम्हाला १८० दिवस म्हणजेच सहा महिने रिचार्जचे टेन्शन राहणार नाही. बीएसएनएलच्या ८९७ रुपयांच्या प्लॅनची माहिती घेऊया...
5 / 8
८९७ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना १८० दिवसांच्या वैधतेसह कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलचा फायदा मिळणार आहे. तसेच दररोज १०० एसएमएस देखील दिले जाणार आहेत.
6 / 8
एवढेच नाही तर ९० जीबी डेटा देखील मिळणार आहे. ज्याचा वापर कमी आहे किंवा बहुतांश वेळ वायफाय आहे त्यांच्यासाठी तर ९०० रुपयांच्या आतील ही पर्वणीच ठरणार आहे.
7 / 8
वापरकर्ता इच्छित असेल तर तो संपूर्ण ९० जीबी डेटा एकाच वेळी वापरू शकतो किंवा त्याच्या सोयीनुसार दररोज देखील वापरू शकतो. समजा डेटा संपला तर तुम्ही डेटा पॅक देखील वेगळे मारू शकता.
8 / 8
या रिचार्जद्वारे तुम्ही एक वर्ष १८०० रुपयांत घालवू शकता. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनसाठी तुम्हाला ३५०० ते ४५०० रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो नाही येतो. यामुळे तुम्ही बीएसएनएलमध्ये पोर्ट केलात तर तब्बर २ ते तीन हजार रुपये वाचवू शकणार आहात.
टॅग्स :BSNLबीएसएनएलAirtelएअरटेलJioजिओVodafoneव्होडाफोन