घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 16:10 IST
1 / 7तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अनेकदा आपण घाईघाईत फोन खरेदी करतो आणि काही दिवसांतच त्याची किंमत कमी होते किंवा त्यावर मोठी ऑफर येते.2 / 7भारतात स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी नेमकी योग्य वेळ कोणती? कोणत्या महिन्यात खरेदी केल्यास तुमचे पैसे वाचतील? याबद्दलचे काही महत्त्वाचे टिप्स खालीलप्रमाणे आहेत.3 / 7भारतात नवीन फोन खरेदी करण्यासाठी सप्टेंबर ते नोव्हेंबर हा काळ सर्वात उत्तम मानला जातो. यादरम्यान 'फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज' आणि 'ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सारखे मोठे सेल येतात. दिवाळी, दसरा आणि होळीच्या काळात बँकांच्या ऑफर्स आणि एक्सचेंज बोनसमुळे फोनच्या किमतीत ३०% ते ४०% पर्यंत घट होऊ शकते.4 / 7जेव्हा एखादा ब्रँड आपली नवीन सिरीज लाँच करतो, तेव्हा जुन्या मॉडेलच्या किमतीत मोठी कपात केली जाते. उदाहरणार्थ, सप्टेंबरमध्ये नवीन iPhone लाँच झाल्यानंतर जुन्या iPhone मॉडेल्सवर भारी डिस्काउंट मिळतो. बजेटमध्ये फ्लॅगशिप फोन हवा असेल, तर ही वेळ सर्वोत्तम आहे.5 / 7याचसोबत जेव्हा नवीन मोबाईल लाँच केला जातो, त्याला चांगला प्रतिसाद मिळण्यासाठी एक्स्चेंज ऑफर्स, क्रेडिट कार्ड कॅशबॅक आदी मोठा डिस्काऊंट दिला जातो. यावेळी तुम्ही नवा लाँच झालेला फोन प्री-ऑर्डर करू शकता. 6 / 7डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि जानेवारीच्या सुरुवातीला कंपन्या आपला जुना स्टॉक संपवण्यासाठी 'इयर-एंड सेल' लावतात. जर तुम्हाला लेटेस्ट फीचर्सची फारशी गरज नसेल, तर गेल्या वर्षीचे टॉप मॉडेल्स या काळात स्वस्तात मिळू शकतात.7 / 7केवळ सणांची वाट न पाहता, जर तुम्हाला अचानक फोन घ्यायचा असेल, तर शुक्रवार किंवा शनिवार या दिवशी ई-कॉमर्स साइट्स चेक करा. अनेकदा विकेंडला ठराविक बँकांच्या (ICICI, HDFC, SBI) कार्ड्सवर १०% पर्यंत इन्स्टंट डिस्काउंट मिळत असतो.