स्मार्टफोनला कव्हर वापरताय? त्याचे तोटेही अनेक आहेत, समजल्यावर काढून टाकाल...
By सिद्धेश जाधव | Updated: January 28, 2022 18:39 IST
1 / 9नवीन स्मार्टफोन विकत घेतल्यावर त्याच्या सुरक्षेसाठी अनेकदा कव्हर विकत घेतला जातो. फोनला कव्हर लावण्याचे काही फायदे आहेत, परंतु त्यामुळे होणारे तोटे देखील कमी नाहीत. आज आपण त्यांची माहिती घेणार आहोत. 2 / 9स्मार्टफोनच्या डिजाईन आणि लूकवर कंपन्या खूप काम करतात. या डिजाईनमुळे काही फोन महाग देखील विकले जातात. परंतु कव्हरमुळे काही प्रीमियम लुकिंग स्मार्टफोनची डिजाईन दिसत नाही. काही स्मार्टफोन तर दुरून ओळखता येतात जर त्यांच्यावर कव्हर नसेल तर. 3 / 9अनेक स्मार्टफोन सोबत मोफत क्लियर केस देण्यात येते. जी कालांतराने धूळ साठून पिवळसर रंगाची होते आणि त्यामुळे स्मार्टफोनची शान निघून जाते. 4 / 9काही कव्हर इतके जाड आणि मजबूत असतात कि त्यामुळे स्मार्टफोनचं वजन वाढतं. असे स्मार्टफोन जास्त वेळ हातात पकडून ठेवल्यास त्रास होतो. तुम्ही कव्हर काढून फोन किती हलका होतो याचा फरक पाहू शकता. 5 / 9कव्हर असलेल्या स्मार्टफोन मधील हिट कव्हरमुळे कमी प्रमाणात बाहेर जाते. त्यामुळे स्मार्टफोनच्या तापमानात वाढ होते आणि त्याचा परिणाम परफॉर्मन्सवर होतो. तापमान जास्त असल्यास बॅटरी लाईफवर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो. 6 / 9फोन कव्हरमध्ये धूळ आणि इतर कचरा अडकून राहतो. तसेच ज्या ठिकाणी ठेवला जातो तिथले जंतू देखील स्मार्टफोन कव्हरवर जमा होतात. त्यामुळे जर तुम्ही कव्हर वापरत असाल किंवा नाही स्मार्टफोन वेळावेळी स्वच्छ करून घ्यावा. त्यासाठी खास लिक्विड ऑनलाईन देखील मिळतात. 7 / 9स्वस्त कव्हर टिकत नाहीत तर चांगले कव्हर स्वस्तात मिळत नाहीत. त्यामुळे स्मार्टफोन कव्हरवर चांगला खर्च करावा लागतो. परंतु कधी कधी कव्हर असून देखील स्मार्टफोन फुटू शकतो. हल्लीचे अनेक स्मार्टफोन चांगल्या प्रोटेक्शनसह येतात त्यामुळे कव्हरचे पैसे तुम्ही वाचवू शकता. 8 / 9तुमच्या स्मार्टफोनला रेंज येत नाही? कॉल ड्रॉप होतात? नेट नीट चालत नाही? यामागे कदाचित तुमच्या स्मार्टफोन कव्हरचा दोष असू शकतो. 9 / 9स्मार्टफोन कव्हरचे काही फायदे नाकारता येत नाहीत परंतु कव्हरला देखील पर्याय आहेत. ज्यात स्किन आणि बम्परचा समावेश आहे. जे सुरक्षा देतात आणि स्मार्टफोन कव्हर इतकी जागा घेत नाहीत, ज्यांचा तुम्ही विचार करू शकता.