By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 20:44 IST
1 / 8जिओ वापरणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. रिलायन्स जिओने आणखी एक प्लॅन बंद केला. आता जिओने ७९९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन काढून टाकला आहे. या प्लॅन ग्राहक मोठ्या प्रमाणात होते.2 / 8जिओच्या या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल, डेटा आणि दररोज १०० एसएमएस देण्यात आले. २४९ रुपयांचा प्लॅन देखील बंद केला आहे. 3 / 8हा ७९९ रुपयांचा प्लॅन जिओच्या मिड-रेंज कॅटेगरीत येतो आणि अनेक महिन्यांपासून त्याची खूप मागणी होती. 4 / 8डेटा- दररोज १.५ जीबी (८४ दिवसांत एकूण १२६ जीबी डेटा),कॉलिंग- सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉल. एसएमएस- दररोज १०० एसएमएस, या प्लॅनची वैधता: ८४ दिवस.5 / 8ओटीटी फायदे: जिओटीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाउडचे मोफत सबस्क्रिप्शन.6 / 8ज्या ग्राहकांना दर तीन महिन्यांनी सोपे आणि परवडणारे रिचार्ज आवडतात त्यांच्यासाठी हा बदल थोडा निराशाजनक असू शकतो. ज्या वापरकर्त्यांना दररोज १.५ जीबी डेटा पुरेसा वाटला, त्यांना आता ६६६ रुपयांचा पॅक निवडावा लागेल किंवा अधिक महागडा पॅक निवडावा लागेल.7 / 8यापूर्वी जिओने २४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन बंद करून ग्राहकांना धक्का दिला होता. हा प्लॅन बजेट-फ्रेंडली पर्यायांपैकी एक होता आणि विशेषतः कमी किमतीत दररोज डेटा आणि अमर्यादित कॉलिंग हवे असलेल्या वापरकर्त्यांसाठी चांगला होता.8 / 8या प्लॅनमध्ये दररोज १ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि २८ दिवसांच्या वैधतेसह दररोज १०० एसएमएस देण्यात येत होते. म्हणजेच, ग्राहकांना सुमारे २८ जीबी डेटाचा लाभ मिळत होता. कंपनी आता २५० रुपयांपेक्षा कमी किमतीत वापरकर्त्यांना काही इतर प्लॅन देत आहे.