By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 23:33 IST
1 / 10 आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. यामुळे मंदिर परिसरदेखील भाविकांची गर्दीने बुधवारी गजबजून गेलेला दिसून आला.2 / 10 पंढरपूर शहरात, नदीपात्र, दर्शनरांग, ६५ एकरात साधारण ५ ते ७ लाख व वाखरी तळावर सुमारे ७ ते ८ लाख असे १२ ते १५ लाख भाविक विठुरायाच्या नगरी दाखल झाले आहेत. 3 / 10मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्ग, पत्रशेड परिसर, आदी परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. त्याचबरोबर विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन, मुखदर्शन रांग पत्राशेडच्या मधील १० नंबरच्या दर्शन मंडपापर्यंत पोहोचली आहे.4 / 10 दर्शनासाठी १८ ते २० तास लागत आहेत. दर्शन रांगेतील भाविकांना समितीने विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.5 / 10त्याचबरोबर भाविकांच्या वर्दळीमुळे मंदिर परिसरातील कुंकुबुक्का, तुळशीच्या माळा, फूलविक्रेते, वेगवेगळ्या धातूंच्या मूर्ती, फोटोफ्रेम, आदी प्रासादिक वस्तू याबरोबरच गर्दीत कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रत्येक चौकात, विविध रस्त्यावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.6 / 10मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्ग, पत्रशेड परिसर, आदी परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. त्याचबरोबर विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन, मुखदर्शन रांग पत्राशेडच्या मधील १० नंबरच्या दर्शन मंडपापर्यंत पोहोचली आहे. 7 / 10आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात होणारी शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सहपरिवार आज सायंकाळी पंढरपुरात दाखल झाले आहेत. 8 / 10त्यांच्या पंढरपुरातील कार्यक्रमावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, कामगार मंत्री सुरेश ख्याडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह अन्य मंत्री, आमदार, खासदार व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 9 / 10तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रेशखर राव तेलगंणा सरकारचे अख्खे मंत्रीमंडळ घेउन दाेन दिवसांपूर्वी पंढरपुरात आले हाेते.10 / 10उद्याच्या सोहळ्यासाठी १५ लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले असल्याची माहिती समोर आली आहे.