शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

सापाला हातात धरून व्हिडीओ शूट करणं पडलं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 16:59 IST

1 / 9
नवी दिल्ली : अमेरिकेत 32 वर्षीय युट्यूबरला तीन फूट लांबीच्या सापाचा व्हिडिओ शूट करणे चांगलेच महागात पडले आहे.
2 / 9
निक बिशप नावाच्या या वन्यजीव दिग्दर्शकाने फ्लोरिडा शहरातील एव्हरग्लेड्स नॅशनल पार्कमध्ये जाऊन या सापाचे शूटिंग सुरू केले.
3 / 9
या शूटिंगदरम्यान या सापाने निकवर जबर हल्ला केला. सापाने हल्ला केल्याचा निकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की, निकने हा साप हातात धरला आहे.
4 / 9
हा बर्मी अजगर आहे आणि तो विषारी नाही, असे निक या व्हिडिओमध्ये सांगत आहे. त्यावेळी हा साप निकच्या हाताला सतत चावा घेण्याचा प्रयत्न करत आहे.
5 / 9
मात्र तो विषारी साप नसल्यामुळे निक या अजगराकडे दुर्लक्ष करताताना दिसून येतो. परंतु यानंतर साप थेट निकच्या थेट डोळ्यावर हल्ला करतो. निकलाही असा हल्ला करेल अशी अपेक्षा नव्हती.
6 / 9
डोळ्यावर हल्ला केल्यानंतर निकने सापाला सोडून दिले आणि स्वत:च्या डोळ्यावर हात ठेवला. यावेळी निकच्या डोळ्यांतून रक्त येऊ लागते होते. सुदैवाने निक या हल्ल्यातून बाचला, कारण सापाचे टोकदार दात निकच्या भुव्यामध्ये लागले होते.
7 / 9
या सापाच्या हल्ल्यानंतर निक म्हणाला की, मी स्वत: ला भाग्यवान समजतो. कारण, माझी हालत यापेक्षा अधिकच वाईट होऊ शकली असती.
8 / 9
निक म्हणाला की मला माहित आहे की, साप माझ्यावर हल्ला करु शकतात, कारण ते स्वत: चे रक्षण करण्यासाठी हे करतात. पण, हा साप माझ्या तोंडावर हल्ला करेल याची मला कल्पना नव्हती.
9 / 9
विशेष म्हणजे फ्लोरिडामध्ये असे कोणतेही प्रकरण समोर आले नाही की जे बर्मीच्या या अजगराच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. मात्र, डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार दरवर्षी सापामुळे एका लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो.
टॅग्स :snakeसापSocial Viralसोशल व्हायरलAmericaअमेरिका