1 / 5आज मोबाइलचे तंत्रज्ञान प्रचंड प्रगत झाले आहे. या प्रगत तंत्रज्ञानाची झलक दाखवणारी एक बातमी समोर आली आहे. एका महिलेने मोबाईल फोनमधील अत्याधुनित फिचरच्या मदतीने फसवत असलेल्या बॉयफ्रेंडला रंगेहात पकडले आहे. टिकटॉकवर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असलेल्या सेरेना केरिगन या महिलेने या संपूर्ण घटनेबाबत टिकटॉकवर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 2 / 5सेरेना हिने टिकटॉकवर एक फोटो शेअर केला आहे. जो तिला तिच्या बॉयफ्रेंडने पाठवला होता. या महिलेचा बॉयफ्रेंड काही कामानिमित्त हॉटेलमध्ये गेला होता. मला तुझी खूप आठवण येतेय, असं त्याने तिला सांगितले होते. मात्र सेरेनाने तिच्या आयफोनमधील एका फिचरचा वापर केल्यावर तिला खरे काय ते समजले. 3 / 5सेरेनाच्या म्हणण्यानुसार, आयफोनमध्ये एक खास प्रकारचे फिचर असते. त्यामधून हा फोन कुठलाही फोटो क्लिक करण्याच्या दीड सेकंद आधी आणि नंतरच्या घडामोडी रेकॉर्ड करतो. जेव्हा सेरेनाने या खास फिचरचा वापर केला तेव्हा त्याने पाहिले की, जो फोटो तिच्या बॉयफ्रेंडने पाठवला होता त्यामध्ये एक महिला उपस्थित होती. 4 / 5बॉयफ्रेंड हॉटेलमध्ये एकटा नसल्याचे सेरेनाने पाहिले. फोनमधील फिचरचा वापर केल्यानंतर तिला एक महिला बॉयफ्रेंडच्या रूममधील बेडवर जम्प मारताना दिसली. त्यानंतर या फोटोवरून कटाक्ष करतान सेरेनाने लिहिले की, जेव्हा तुमचा बॉयफ्रेंड फोटो पाठवून सांगेल की, तो तुम्हाला मिस करत आहे तेव्हा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्याचे पितळ उघडे पडो. 5 / 5हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. टिकटॉकवर हा व्हिडीओ दहा लाख वेळा लाईक केला गेला आहे. या महिलेने आता एफबीआय जॉईन केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर अनेकजण असेही होते ज्यांनी सांगितले की, त्यांना या फिचरबाबत काहीच माहिती नव्हती. मात्र आता ते या फिचरबाबत सावध होती.