अरे व्वा! महाकुंभमधील मोनालिसाचा नवा लूक पाहिलात का?, सुंदर फोटो जोरदार व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:44 IST
1 / 10महाकुंभमध्ये आलेल्या एका सुंदर डोळ्यांच्या तरुणीने सर्वाचंच लक्ष वेधून घेतलं. ती तरुणी म्हणजे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेली मोनालिसा. 2 / 10व्हायरल गर्लची जोरदार चर्चा रंगली. तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळेच पुढे तिच्यावर कुंभमेळा सोडण्याची वेळ आली.3 / 10महाकुंभमध्ये माळा विकणाऱ्या या मोनालिसाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तिचा पाठलाग करायला सुरुवात केली. 4 / 10मध्य प्रदेशची रहिवासी असलेली मोनालिसा माळा विकण्यासाठी आपल्या कुटुंबीयांसोबत महाकुंभमध्ये आली होती. 5 / 10व्हायरल झाल्यानंतर मोनालिसाचं नशीब आता फळफळलं आहे. तिला चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या आहेत. 6 / 10मोनलिसाचे सुंदर फोटो पुन्हा एकदा व्हायरल झाले आहेत. तिचा नवा लूक पाहिल्यावर तिला ओळखणं देखील कठीण झालं आहे. 7 / 10प्रयागराज महाकुंभातील सर्वात चर्चेत आणि लक्ष वेधून घेणारी मोनालिसा तिचा आगामी चित्रपट 'द मणिपूर डायरी'च्या शूटिंगसाठी महेश्वरहून मुंबईला रवाना झाली आहे. 8 / 10चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा स्वतः तिला घेण्यासाठी खरगोन जिल्ह्यातील महेश्वर येथे पोहोचले.9 / 10चित्रपटाच्या टीमने मोनालिसाच्या कुटुंबाशी चर्चा केली आणि चित्रपटाच्या शूटिंगसाठी मोनालिसासोबत मुंबईला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. 10 / 10चित्रपटाच्या टीमने मोनालिसाच्या कुटुंबाशी चर्चा केली आणि चित्रपटाच्या शूटिंगसाठी मोनालिसासोबत मुंबईला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.