By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 16:42 IST
1 / 10प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. त्यांच्या ट्विटलाही फॉलोअर्स देखील खूप आहेत. यावेळी आनंद महिंद्रा यांनी करोडो रुपयांच्या फेरारी कारचा फोटो पोस्ट केला आहे. 2 / 10हा साधासुधा फोटो नाहीय, तर ती कार एका अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयाची आहे, त्यात ती फेरारी आहे. यामुळे या फोटोचे वजन आणखीनच भारी आहे. 3 / 10आनंद महिंद्रांनी फेरारी कारवर आपले मत व्यक्त केले आहे. ते आता कमालीचे व्हायरल होत आहे. जाणून घ्या महिंद्रा असे का म्हणाले. 4 / 10खरेतर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियाद्वारे लोकांना वारेमाप खर्च, उधळपट्टी न करण्याचा सल्लादिला आहे. यासाठी त्यांनी अमेरिकेतील भारतीयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 5 / 10व्हि़डीओमध्ये एक सोनोरी रंगाची फेरारी कार (Gold Ferrari Car) दिसत आहे. यामध्ये दोन लोक आहेत. या व्हि़डीओमध्ये शद्ध सोन्याच्या फेरारी कारसोबत भारतीय अमेरिकी, असे म्हणतानाचा आवाज येत आहे. 6 / 10यावर आनंद महिंद्रांनी म्हटले की, मला माहिती नाही की हा सोशल मीडियावर का व्हायरल होत आहे, श्रीमंताला आपला पैसा कसा खर्च करावा याचा धडा मिळायला हवा. पैसा कसा खर्च करू नये याचे उदाहरण.7 / 1054 सेकंदांचा हा व्हिडीओ 207k हून अधिकवेळा पाहिला गेला आहे. तसेच 7,529 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. आनंद महिंद्रांच्या या पोस्टला सोशल मीडियावर बरेचजण सहमत असल्याचे दिसत आहेत. 8 / 10एका युजरने म्हटले की मला समजत नाही की असे केल्याने काय मिळते. दुसऱ्या युजरने म्हटले की सुपरकारवर मला दया वाटत आहे. सोनेरी रंगाच्या आड लाल किंवा पिवळा रंग झाकला गेला आहे. 9 / 10अन्य एका युजरने म्हटले की, प्रत्येक चमकणारी वस्तू सोने होत नाही. कारला महागड्या धातूने कोटिंग करणे पैशांचा अपव्यय आहे. 10 / 10काही लोक या महिंद्रांच्या या मताला असहमत देखील होते. तसे पहायला गेले तर ती एक हौस आहे. हौसेला मोल नसते. नाहीतर लोकांनी काही लाखांच्या कारसाठी लाख, दोन लाख रुपये खर्च करून फॅन्सी नंबर घेतले नसते.