By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 14:35 IST
1 / 11अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील एव्हेंजर्स आणि हॉलिवूड स्टार्सच्या AI फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. सुपरहिरोज रामलल्लाच्या चरणी लीन झाल्याचं पाहायला मिळत आहेत. 2 / 11फोटोमध्ये आयर्न मॅन, बॅटमॅन, डेडपूल, जोकर, सुपरमॅन, जॅक स्पॅरो, वंडर वुमन, लोकी, थॉर, ग्रूट, थायनोस, डॉक्टर स्ट्रेंज आणि हॅरी पॉटर यांसारखे सुपरहिरो आणि हॉलिवूड स्टार्सनी भगवे कपडे परिधान केलेले दिसत आहेत. 3 / 11आयर्न मॅन आणि बॅटमॅन झाडू मारताना दिसत आहेत. हे फोटो सर्वांचच लक्ष वेधून घेत आहेत. 4 / 11डेडपूल आणि जोकरने देखील मंदिर परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी घेतलेली पाहायला मिळत आहे. 5 / 11सुपरमॅनचा कमाल लूक पाहायला मिळत आहे. त्याने कपाळावर टिळा लावला आहे, फेटा बांधला आहे. खांद्यावर फुलांच्या माळा घेऊन जात असल्याचं दिसतं.6 / 11मॉर्वल्सचा सुपरहिरो लोकी पेटी वाजवताना दिसत तर थॉर तबला वाजवताना दिसला. त्याने भगव्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. 7 / 11जॅक स्पॅरो आणि वंडर वुमन दिवे लावताना दिसत आहेत. दिव्यांनी परिसर उजळून निघाला आहे. 8 / 11ग्रूट आणि थायनोस स्वयंपाक करताना दिसतात. AI तंत्रज्ञानाचा वापर करून हे फोटो तयार केले आहेत. 9 / 11AI आर्टीस्ट म्हणणे आहे की, त्याला हे फोटो तयार करून लोकांना हसवायचं होतं आणि अध्यात्माची जाणीव करून द्यायची होती.10 / 11हॅरी पॉटर आणि त्याचे इतर मित्र सेल्फी घेताना दिसतात. फोटोवर लोकांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. 11 / 11इन्स्टाग्रामवर शाहिद एसके (sahixd) नावाच्या एआय क्रिएटरने हे फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टवर आतापर्यंत हजारो लाईक्स आल्या आहेत.