1 / 10वजन कमी करण्यासाठी अत्यंत कष्ट घ्यावे लागतात. पण ते कष्ट घेतलेच पाहिजेत. स्थुलता अनेक प्रकारच्या आजारांना आमंत्रण देते. वेळीच वजन कमी केले पाहिजे. 2 / 10असे काही सेलिब्रिटी आहेत, जे आत्ता प्रचंड फिट आहेत, मात्र एकेकाळी भरपूर स्थूल होते. त्यांची फॅट टू फिट जर्नी अत्यंत प्रेरणादायी आहे.3 / 10भुमी पेडणेकर हिने ३३ किलो वजन कमी केले आहे. तिला तिच्या अति वजनामुळेच पहिला चित्रपट मिळाला. नंतर तिने वजन कमी केले (Weight Loss).4 / 10बॉलिवूडमधील गाजलेली फॅट टू फिट जर्नी ही सारा अली खानची आहे. तिने भरपूर वजन कमी केले. ती फारच जास्त स्थूल होती.5 / 10अर्जुन कपूरला आत्ता सिक्स पॅक्स असले तरी, एकेकाळी तो भरपूर जाड होता (Weight loss tips). १४ महिन्यात त्याने त्याचे वजन कमी केले.6 / 10भारती सिंग ही फार नावाजलेली विनोदी कलाकार आहे. तिच्या कारर्कीर्दीची सुरवात स्वत:च्या स्थूल शरीरावर विनोद करूनच झाली. मात्र आता तिने चांगलेच वजन कमी केले आहे.7 / 10दंगल चित्रपटासाठी अमीर खानने जवळपास २५ किलो वजन वाढवले होते. आणि नंतर तेवढेच वजन कमीही केले (Healthy Weight Loss). त्याला ५ महिन्यांचा कालावधी लागला होता.8 / 10एकेकाळचा अदनान सामी हा अत्यंत गाजलेला गायक आहे. त्याने १२० किलो कमी केले आहे. तो २३० किलोचा होता. डॉक्टरांनी वजन कमी करा नाही तर, जगणे कठीण आहे. असे सांगितल्यावर त्याने एवढे वजन कमी केले.9 / 10सोनाक्षी सिन्हा आजही चबी गर्ल म्हणूनच ओळखली जाते. पण पूर्वी ती भरपूर जाड होती. तिने जवळपास ३० किलो वजन कमी केले आहे.10 / 10नियमित डाएट करून आणि व्यायाम करून वजन कमी करता येतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे परिनिती चोप्रा. तिने जवळपास २८ किलो वजन कमी केले. ती मार्शल आर्ट व कलारीपयट्टू हे प्रकार शिकलेली आहे.