1 / 7महिला दिन खरंतर एक दिवस साजरा करून उपयोग नसतो. कारण आपल्यासाठी झटणाऱ्या, आपल्या पाठीमागे उभं राहणाऱ्या महिलांच्या कामाची कदर रोजच होणं गरजेचं असतं. पण तरीही ८ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हाला तुमच्या आई, ताई, बहीण, आजी, मैत्रिण किंवा अशाच तुमच्यासाठी स्पेशल असणाऱ्या महिलांना गिफ्ट द्यायचं असेल तर या काही पर्यायांचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता..2 / 7हल्ली सगळ्यांकडे सगळंच असतं.. त्यामुळे पुन्हा त्याच त्या वस्तू देण्यात काही मजा नाही. त्यामुळे यंदा महिला दिनाच्या गिफ्टसाठी या काही वेगळ्या पर्यायांचा विचार करा...3 / 7बऱ्याच दिवसांपासून त्यांनी नाटक, सिनेमा पाहिला नसेल तर ते पाहण्यासाठी त्यांना घेऊन जा.. मनापासून त्या एन्जॉय करतील.4 / 7त्यांनी स्वत:चा फिटनेस जपावा असं वाटत असेल पण त्यांच्याकडून स्वत:च्या व्यायामासाठी वेळ काढणं होत नसेल तर एखाद्या जीममध्ये त्यांना ॲडमिशन घेऊन द्या.. यानिमित्ताने त्या रोज व्यायाम करून फिट राहतील.5 / 7त्यांच्या आवडीच्या हॉटेलमध्ये नेऊन त्यांना त्यांच्या आवडीच्या पदार्थांची मस्त टेस्टी ट्रिट द्या.. खूप खुश होऊन जातील.6 / 7त्यांच्यासाठी एक दिवसाचा वेळ काढता आला तर नक्की काढा आणि त्यांना छान एक दिवसाच्या ट्रिपला न्या.. कधी कधी छोट्याशा ब्रेकची गरज असते. अशा ट्रिपच्या माध्यमातून त्यांना तो ब्रेक नक्कीच मिळू शकतो आणि पुन्हा रिफ्रेश होऊन कामाला सुरुवात होऊ शकते..7 / 7बहुतांश महिलांना पार्लरमध्ये जायला आवडतं. पण कधी वेळ नसतो तर कधी पार्लरमध्ये जाऊन खूप पैसे खर्च करण्याची इच्छा नसते. म्हणूनच महिला दिनानिमित्त तुमच्या शहरातल्या एखाद्या उत्तम सोयीसुविधा देणाऱ्या पार्लरमध्ये त्यांची अपॉईंटमेंट घ्या आणि त्यांना त्यांच्या आवडीच्या ब्यूटी ट्रिटमेंट्स घ्यायला सांगा.. बहुतांश महिलांना हे गिफ्ट नक्कीच आवडेल..