1 / 6हिवाळा हा तब्येतीच्या दृष्टीने अतिशय आरोग्यदायी ऋतू मानला जातो. असं म्हणतात की या दिवसांत आपण जे खातो, ते छान अंगी लागतं (weight loss tips for winter). या दिवसांत वजन कमी करण्याचा प्रयत्न केला तर तोदेखील लवकर यशस्वी होतो.(low Calorie food for weight loss)2 / 6त्यामुळेच हिवाळा संपण्याच्या आधीच अगदी महिनाभरातच वजन कमी करायचं असेल तर दररोज नाश्त्याला कोणते पदार्थ घेतले पाहिजेत, याची माहिती आहारतज्ज्ञांनी dt.gagan_sidhu या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहा..(4 winter food for fast weight loss)3 / 6त्यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ आहे उकडून घेतलेले रताळे आणि हरबरे. हे दोन्ही मिळून एक वाटीपेक्षा जास्त व्हायला नको. ते चवदार करण्यासाठी तुम्ही त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो किंवा इतर काही मसाले टाकू शकता.4 / 6दुसरं आहे ब्रोकोली आणि मशरूम यांचं सलाड. हे देखील एका वाटीपेक्षा जास्त खाऊ नका.5 / 6तिसरं आहे राजमा. साधारण वाटीभर राजमा तुम्ही खाऊ शकता. त्याची उसळ करून खा किंवा मग टिक्की करून खा. किंवा आणखी एखादा पदार्थ करूनही खाऊ शकता. फक्त वेगळा पदार्थ करताना त्याच्यातल्या कॅलरी वाढणार नाही, याकडे मात्र लक्ष द्या. 6 / 6चौथा पदार्थ आहे वाटीभर मखाना चाट. मखाना चाट करताना त्यात तुमच्या आवडीचे मसाले आणि कांदा, टोमॅटोसकट इतर भाज्याही टाकू शकता.