म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 8१. काही वर्षांपुर्वी फक्त नवरीच पायावर मेहेंदी काढायची. पण आता मात्र नवरीची आई, तिच्या बहिणी, मैत्रिणी सगळ्याच जणी हौशीने पायावर मेहेंदी काढून घेतात. अर्थात नवरीप्रमाणे त्यांची मेहेंदी खूप भरगच्च नसते.2 / 8२. म्हणूनच जर पायावर एखादी सोपी, चटकन होणारी आणि अगदी नाजूक डिझाईनची मेहेंदी काढायची असेल, तर या बघा काही सोप्या डिझाईन्स.3 / 8३. हातावर जशी अरेबियन पद्धतीने डिझाईन काढतात, तशी आता पायावर देखील काढण्यात येते. एखाद्या वेलीप्रमाणे दिसणारी ही नक्षी पायांना निश्चितच आणखी शोभा आणते.4 / 8४. काही जणी फक्त पैंजण घातल्याप्रमाणे पायांवर डिझाईन काढतात. अशी पैंजण मेहेंदी सध्या भलतीच चर्चेत आहे.5 / 8५. अशा पद्धतीची डिझाईन भरगच्च वाटत असली तरी ती काढायला खूपच कमी वेळ लागतो. शिवाय डिझाईनही अगदी सोपं आहे. डिझाईन विरळ आहे, पण तरीही अगदी पाय भरून काढल्यासारखं वाटतं.6 / 8संपूर्ण पायाला मेहंदीची नाजूक नक्षी काढून बॉर्डर करणे आणि बोटावर अगदी थोडंसं डिझाईन काढणे अशा पद्धतीची फॅशनही हल्ली ट्रेंडिंग आहे.7 / 8हे त्यातलंच एक नाजूक डिझाईन. यामध्ये फक्त पायाच्या बोटांवर मेहेंदी काढली जाते. खूप मोठं डिझाईन आवडत नसेल, तर अशा पद्धतीची नक्षी तुम्हाला आवडू शकते.8 / 8८. पायावर खूप भरगच्च मेहेंदी आवडत नसेल, तर असं एखादं सुटसुटीत, सोपं डिझाईन काढू शकता.