म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 10 १. सध्या लग्नसराई सुरु असल्याने जेवढे काही एथनिक, ट्रॅडिशनल दागदागिने आहेत, ते सगळेच खूपच डिमांडमध्ये आहेत. त्यात जर मराठी कुटूंबातलं लग्न असेल तर हमखास मराठमोळी वेशभुषा केलीच जाते.... आता मराठी लूकला कम्प्लिट करायचं असेल तर कानात छानशी, ठसठशीत बुगडी हवीच... 2 / 10२. म्हणूनच तर यंदाच्या लग्नसराईमध्ये बुगडी खरेदी करण्याचा विचार असेल, तर या काही बुगडी डिझाईन्सवर हमखास एक नजर टाका.. यातले बरेच डिझाईन्स सोन्यामध्येही उपलब्ध आहेत आणि लोकल मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी १००- २५० रुपये या रेंजमध्ये मिळत आहेत. 3 / 10३. मोराचं डिझाईन आवडत असेल तर अशा प्रकारचे डिझाईन तुम्ही निवडू शकता.. कानातलं असो, नथ असो किंवा अंगठी असो.. मोराचं डिझाईन हमखास इन असतं..4 / 10४. खूप मोठी ठसठशीत बुगडी आवडत नसेल तर ही नाजूक बुगडीही अतिशय आकर्षक दिसते. या बुगडीचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही केवळ लग्नकार्यातच नाही, तर एरवी कधीही ही बुगडी घालू शकता. 5 / 10५. बऱ्याच जणींकडे लक्ष्मीहार असतो. लक्ष्मीहाराच्या जोडीला त्याच्यासारखेच कानातले घातले जातात. तुम्ही जर लक्ष्मीहार आणि त्यावर मॅचिंग कानातले असा लूक करणार असाल तर त्याच्या जोडीला या लक्ष्मीहार डिझाईनच्या बुगड्याही घेऊन टाका.. छान दिसेल.6 / 10 ६. असाच मॅचिंग लूक तुम्हाला मोत्याच्या दागिन्यांचा आणि मोत्याच्या बुगडीचा करता येईल. चिंचपेटी किंवा तन्मणी असा मोत्याचा दागिना घालणार असाल तर कानात मोत्याच्याच ठसठशीत कुड्या घाला आणि त्याला मॅचिंग होणारं अशा पद्धतीचं बुगडी डिझाईन घ्या..7 / 10७. तुमच्या मोत्याच्या नथीला मॅच होणारं डिझाईन पाहिजे असेल तर बुगडीचं हे डिझाईन अगदी शोभून दिसेल. 8 / 10८. ठसठशीत आणि मोठ्या डिझाईनच्या बुगड्या आवडत असतील, तर या डिझाईनसारखे अनेक डिझाईन्स मिळू शकतात. असे डिझाईन्स चारचौघांत नक्कीच उठून दिसतात.9 / 10९. ऑक्सिडाईज बुगडी घेणार असाल तर असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. खण खाडीवर किंवा ज्या साड्यांचे काठ सिल्व्हर रंगाचे असतात, त्या साड्यांवर घालण्यासाठी या बुगड्या छान दिसतात.10 / 10१०. ऑक्सिडाईज बुगडी प्रकारातलं हे आणखी एक डिझाईन. या डिझाईनमध्ये असे अनेक रंग मिळतात. प्रत्येक साडीवर, ड्रेसवर मॅचिंग बुगडी घालता येते. शिवाय हे डिझाईन एवढं सोबर आहे की साडीप्रमाणेच ड्रेसवरही उठून दिसतं.