शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

कांदा आणि चहा पावडरचा सोपा उपाय, केस विंचरताना कंगव्यात एकही तुटलेला केस दिसणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2026 19:06 IST

1 / 8
केस खूप जास्त गळायला लागले असतील किंवा त्यांना अजिबातच वाढ नसेल तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा..(how to control hair fall?)
2 / 8
हा उपाय करण्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा घ्या आणि तो बारीक चिरा.(home hacks to get rid of hair fall)
3 / 8
त्यानंतर गॅसवर एका पातेल्यामध्ये अर्धा ग्लास पाणी गरम करायला ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात चिरलेला कांदा घाला.(use of onion and tea powder to stop hair fall)
4 / 8
त्यात १ ते दिड चमचा चहा पावडर घालून पाणी उकळून घ्या. पाणी उकळून अर्ध झालं की गॅस बंद करा.
5 / 8
यानंतर ते पाणी थंड झाल्यानंतर गाळून घ्या. या पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस घाला. जर तुमच्या डोक्यात कोंडा असेल तर लिंबाच्या रसामुळे तो देखील कमी होईल.
6 / 8
सगळ्यात शेवटी त्यामध्ये १ चमचा तुम्ही जे तेल नेहमी लावता ते घाला. सगळे पदार्थ हलवून घ्या आणि हे मिश्रण केसांच्या मुळाशी लावून हलक्या हाताने मालिश करा.
7 / 8
अर्ध्या तासाने केस धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास महिना भरातच केसांमध्ये खूप चांगला परिणाम दिसून येईल. केस गळणं थांबेल आणि केसांची चांगली वाढही होईल.
8 / 8
केसांची चांगली वाढ होण्यासाठी आणि केस मऊ, सिल्की होण्यासाठी १ चमचा खोबरेल तेल, अर्धा चमचा कॅस्टर ऑईल आणि रोजमेरी ऑईलचे ३ ते ४ थेंब एकत्र करून त्याने डोक्याला मालिश केल्यासही खूप चांगला परिणाम दिसून येतो.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHome remedyहोम रेमेडीHair Care Tipsकेसांची काळजी