शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जुन्या काठपदराच्या साड्यांचे शिवा लहान मुलींसाठी सुंदर ड्रेस; १० आकर्षक-युनिक डिजाईन्स..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 11:00 IST

1 / 10
कपाटातल्या जुन्या साड्यांचं काय करायचं हा नेहमीच प्रश्न असतो. महागतल्या साड्या कोणाला द्यायची किंवा फेकून देण्याचीही इच्छा होत नाही. या साड्यांपासून तुम्ही लहान मुलींचे सुंदर ड्रेस शिवू शकता. (How To Make Kids Dresses Using Saree)
2 / 10
कॉटन, सिल्क, ऑर्गेजा अशा कोणत्याही प्रकारच्या साड्या तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्यापासून सुंदर ड्रेसेस शिवू शकता.
3 / 10
एखाद्या अनुभवी टेलरकडून तु्म्ही ५०० ते १००० रूपयांत असे सुंदर ड्रेसेस शिवून घेऊ शकता जे मुलींना कुठेही लग्नकार्यात किंवा खास कार्यक्रमांत घालता येतील.
4 / 10
जुन्या साड्यांपासून लहान मुलींचे ड्रेस शिवताना सर्वप्रथम ड्रेसचा प्रकार ठरवा. तुम्ही A-लाइन फ्रॉक, अनारकली फ्रॉक किंवा घागरा-चोली असे पारंपरिक कपडे शिवू शकता.
5 / 10
ड्रेस शिवण्यासाठी साडी कापताना विशेष काळजी घ्या. ड्रेससाठी आवश्यक भाग जसे की, गळा, बाही, आणि कमरेचा भाग योग्य मापाने कापून घ्या.
6 / 10
ड्रेस पूर्ण झाल्यावर त्याला बटणे,नाडी किंवा लेस जोडून आकर्षक बनवा. ड्रेसला व्यवस्थित इस्त्री करून त्याचा लुक पूर्ण करा.
7 / 10
पदराच्या कापडापासून ब्लाऊज शिवू शकता बाकी साडीचं कापड घेऊन सुंदर साडीचे स्टिचेच शिवून घ्या.
8 / 10
घागरा चोलीचे हे पॅटर्नसुद्धा उठून दिसेल. हे पॅटर्न तुम्ही सहज घालू शकता.
9 / 10
यावर तुम्ही आपल्या आवडीनुसार लेस लावून घेऊ शकता किंवा गोंड्यांनी सजवू शकता.
10 / 10
फ्रिलचे फ्रॉक्ससुद्धा सुंदर दिसतात. नेट पॅटर्नचा गळा शिवून तुम्ही फ्रिलचा फ्रॉक शिवू शकता.
टॅग्स :Shoppingखरेदीfashionफॅशन