1 / 9ऑक्सिडाईज दागिन्यांची सध्या खूप क्रेझ आहे. हल्ली तर अनेक पारंपरिक साड्यांनाही सिल्व्हर किंवा चंदेरी रंगातले काठ येत आहेत. त्यामुळे त्या साडीवर मग अनेकजणी ऑक्सिडाईज दागिने घालतात.2 / 9लग्नसराईसाठी पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने घेणार असाल तर हे काही मराठमोळे दागिने तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच पाहिजेत.3 / 9यापैकी सगळ्यात पहिला दागिना म्हणजे नथ. पारंपरिक तसेच अधुनिक ऑक्सिडाईज नथीचे अनेक प्रकार बाजारात मिळतील. 4 / 9महाराष्ट्राची ओळख सांगणारा दुसरा दागिना म्हणजे कुड्या. काही वर्षांपर्यंत फक्त मोत्याच्याच कुड्या मिळायच्या. पण आता मात्र ऑक्सिडाईज कुड्याही मिळतात.5 / 9ऑक्सिडाईज ठुशीचे कित्येक प्रकार तुमच्या शहरातल्या बाजारपेठेत किंवा मग ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळतील.6 / 9असा ठसठशीत कोल्हापुरी साज लग्नकार्यात शोभून दिसतो. तो एकच दागिना घातला तरी पुरेसा आहे. 7 / 9 प्राजक्ता माळीच्या गळ्यात जो लांब दागिना आहे त्याला एकदाणी असे म्हणतात. तो ही पारंपरिक मराठी दागिना म्हणून ओळखला जातो. 8 / 9गळ्यातला जो हा दागिना आहे त्याला बोरमाळ म्हणतात. लग्नसराईसाठी साडीवर असे पारंपारिक दागिने खूप खुलून दिसतात. 9 / 9पारंपरिक लक्ष्मीहाराचा हा एक मॉडर्न प्रकार म्हणता येईल.