शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नेहमीची जिन्स घालून कंटाळलात, ‘हे’ ५ जिन्स प्रकार पाहा! वय काहीही असो दिसाल एकदम हॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2025 14:43 IST

1 / 7
जिन्स ही कायम घट्टच असते. तसेच त्यात प्रचंड उकडते आणि मांड्यांना त्रासही होतो. असा या पॅण्ट प्रकाराबद्दल सगळ्यांचा समज आहे. मात्र आजकाल अशा ही जिन्स मिळतात, ज्या दिसायला एकदम सुंदर असतातच त्यासोबत हलक्या आणि आरामदायी असतात.
2 / 7
जिन्स फक्त कॉलेजातल्या मुलींनी घालावी असा काहीच नियम नाही. वयाने मोठ्या महिलांनाही जिन्स छान दिसते. ऑफीसला जाताना किंवा फिरायला जाताना जिन्स घालणे हा पर्याय नक्की निवडावा. आजकाल विविध प्रकारच्या पॅण्ट्स मिळतात. तसेच प्रकार जिन्समध्येही आहेत.
3 / 7
जिन्स अंगाला चिकटलेली घेतली की तिचा त्रास होतो. त्यामुळे स्किनी जिन्स न घेता, स्ट्रेट फिट घ्यावी. एकदम मस्त दिसते तसेच त्यावर फक्त टॉपच नाही तर कुर्ताही छान दिसतो.
4 / 7
दुसरा सध्या फार लोकप्रिय असलेला प्रकार म्हणजे वाईड लेग. पायाला अगदी मोकळीढाकळी बसणारी ही पॅण्ट तरुण मुलींमध्ये फार प्रसिद्ध आहे. दिसते छान आणि शॉर्ट कुर्तीखाली मस्त वाटते.
5 / 7
एकदम रॉयल लूक हवा असेल तर फ्लेअर जिन्स वापरुन पाहा. गुडघ्यापर्यंत जरा फिट आणि त्याखाली एकदम सैल असा हा प्रकार खरंच फार छान दिसतो. त्यावर कोणताही टॉप छान वाटतो.
6 / 7
मॉम जिन्स हा प्रकार तसा फार लोकांना माहिती नाही. मात्र वाईड हिप्स असलेल्या महिलांसाठी हा प्रकार अगदी आरामदायी आहे. कंबरेपाशी जिन्स अनेकांना फार घट्ट बसते. हा प्रकार अशाच महिलांसाठी खास आहे.
7 / 7
बुट कट जिन्स हा प्रकार तसा जुनाच आहे. ही जिन्सही एकदम सैलसर असते. मांड्यांना एकदम मस्त बसते आणि या जिन्समधून ओटीपोटाजवळील फॅट्स कमी दिसतात. त्याचे फिटींगच त्यानुसार असते.
टॅग्स :fashionफॅशनWomenमहिलाSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाBeauty Tipsब्यूटी टिप्सShoppingखरेदी