1 / 10फक्त हृदय विकाराने नाही, तर इतर कारणांनीही छातीत दुखू शकते.2 / 10मध्येच कधीतरी अचानक छातीत दुखायला लागते. आपण घाबरून जातो. पण छातीत दुखण्यासाठी ही कारणेही असू शकतात.3 / 10छातीत अचानक जळजळायला लागते. अपचनामुळे असे होऊ शकते. शरीरात गॅस भरल्याने छाती दुखते .4 / 10स्नायू ताणले गेल्यानेही छातीत दुखते. छाती जवळील स्नायूंवर ताण पडल्याने किंवा लचक भरल्याने छातीत दुखते.5 / 10घाबरल्याने छातीत दुखते. अशावेळी लांब श्वास घ्या. आणि शांत व्हा.6 / 10अति विचाराने छातीत कळ येऊ शकते. तुम्ही जास्त स्ट्रेस घेतलात तरी छाती दुखते. 7 / 10हृदयाच्या दिशेने जास्तीचा रक्त प्रवाह झाल्यात छातीत कळ येते. ताणतणावामुळे किंवा थकव्यामुळे असे होते.8 / 10धावपळ केल्याने दम लागतो. अति दम लागल्यानेही छातीत दुखते. 9 / 10पण जर घाम फुटायला लागला, चक्कर यायला लागली, शरीरभर त्रास जाणवायला लागला, तर मात्र लगेच दवाखाना गाठा.10 / 10हृदय विकाराचा झटका आल्यावर लागलीच उपाय करणे फार गरजेचे असते.