शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नारळाच्या तेलात मिसळा ५ आयुर्वेदिक गोष्टी, आंघोळीपूर्वीचा खास उपाय- चेहरा चमकेल ब्राइडल फ्रेशियलसारखा, डागही जातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2025 09:05 IST

1 / 7
चेहऱ्यावर सतत पिंपल्स, त्वचेवर घाम येणे, मुरुमे आणि डाग या सर्वांमुळे आपल्यापैकी अनेक जण वैतागले आहेत. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी अनेक महागडी उत्पादने त्वचेवर लावतात. (Coconut oil for face before bath)
2 / 7
चेहऱ्याच्या समस्या घालवण्यासाठी आंघोळीपूर्वी हे उपाय करुन पाहा. चेहरा गोरा तर होईल पण डाग निघून जाण्यास मदत होईल. (How to apply coconut oil on face daily)
3 / 7
नारळाचे तेल आणि गुलाबजलाचे काही थेंब मिसळून चेहऱ्यावर लावा. २० ते २५ मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. गुलाबजल त्वचेला टोन करते.
4 / 7
मृत पेशी काढून टाकण्यासाठी चेहऱ्यावर २ ते ३ मिनिटे नारळाच्या तेलाने मसाज करा. ३० मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवा.
5 / 7
चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी २ चमचे बेसनाच्या पीठात नारळाचे तेल समप्रमाणात मिसळून याची पेस्ट तयार करा. ३० मिनिटे तसेच राहू द्या. सुकल्यानंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करा.
6 / 7
त्वचा टॅन झाली असेल तर मुलतानी माती आणि खोबऱ्याचे तेल मिसळून फेसपॅक तयार करा. सुकल्यानंतर चेहरा धुवा. यामुळे त्वचेवरील धूळ, घाण आणि तेल काढून टाकेल.
7 / 7
आंघोळीपूर्वी त्वचेवर नारळाचे तेल आणि चंदनाचा लेप लावल्याने त्वचा थंड राहते. तसेच त्वचेवरील लालसरपणा, मुरुमे आणि जळजळ कमी होते.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी