शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

संक्रांतीला वाण म्हणून ५० रुपयांपेक्षाही कमी किमतीत लुटता येतील सुंदर दागिने- बघा आकर्षक पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2024 17:03 IST

1 / 13
संक्रांतीला हळदी- कुंकू कार्यक्रमाला वाण म्हणून काय लुटायचं हा प्रश्न प्रत्येकीला पडतो. कारण आपली वाणाची वस्तू नेहमीपेक्षा वेगळी असावी आणि शिवाय ती सगळ्यांना उपयुक्त ठरेल अशी असावी असं वाटतं...
2 / 13
आता महिलांचे दागिना प्रेम तर काही विचारायलाच नको. कितीही असले तरी दागिने कमीच वाटतात. म्हणून यंदा तुमचं बजेट थोडं जास्त म्हणजे ३०, ४०, ५० रुपये एवढं असेल तर या दागिन्यांचा तुम्ही वाण म्हणून नक्कीच विचार करू शकता.
3 / 13
सगळ्यात पहिला दागिना म्हणजे नथ. नथीचे कित्येक प्रकार अगदी १० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत मिळतात.
4 / 13
मोत्यांच्या कुड्याही खूप स्वस्त मिळतात. तुमच्या शहरातील लोकल मार्केटमध्ये गेल्यास ३० ते ५० रुपयांत सुंदर कुड्या मिळतील.
5 / 13
मोत्यांच्या कुड्यांऐवजी स्टोनच्या ट्रेण्डी, डेलीवेअर कानातल्यांचाही विचार करू शकता.
6 / 13
हल्ली ऑक्सिडाईज दागिने घालण्याची फॅशन आहेच. त्यामुळे ऑक्सिडाईज नोज पिन देण्याचा विचारही तुम्ही करू शकता. तुमच्या बजेटमध्ये त्यात खूप व्हरायटी मिळतील.
7 / 13
ब्रेसलेट किंवा गोठ बांगडी देण्याचा विचारही नक्कीच करा. कारण ब्रेसलेट किंवा गोठ बांगड्या बऱ्याचदा घालण्यात येतात.
8 / 13
हल्ली सणावाराला किंवा लग्नकार्यात नऊवारी नेसण्याचं प्रमाण खूप वाढलंय. त्यामुळे पारंपरिक वेशभुषा केल्यावर खोपा पिन लागतेच. ही खोपा पिन ३० ते ५० रुपयांत मिळू शकते.
9 / 13
मोत्याची अगदी साधी माळदेखील खूप डिसेंट लूक देते. अशी माळ ३० ते ५० रुपयांत लोकल मार्केटमध्ये सहज मिळून जाईल.
10 / 13
साडी पिन अगदी प्रत्येकीला कधी ना कधी लागतेच. त्यामुळे वाण म्हणून साडी पिनही लुटू शकता.
11 / 13
३० ते ५० रुपयांत अंगठ्यांचे खूप छान- छान प्रकार मिळतील. ऑक्सिडाईज अंगठी देण्याचा विचारही तुम्ही नक्कीच करू शकता.
12 / 13
केसांना लावण्याच्या पिना, रबर, क्लचर या देखील रोजच्या वापरातल्या खूप उपयोगाच्या वस्तू आहेत. त्यांच्यातल्या चांगल्या पर्यायांचा नक्कीच विचार करा.
13 / 13
अशाप्रकारचे आर्टिफिशियल गजरे किंवा फुलं दिले तरी छान वाटेल.
टॅग्स :ShoppingखरेदीMakar Sankrantiमकर संक्रांतीjewelleryदागिने