By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 16:28 IST
1 / 10शिव जयंती (Shiv Jayanti 2026) हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा आणि अभिमानाचा सोहळा आहे. या दिवशी भगवा किंवा ऑरेंज रंग उत्साहाचे आणि स्वराज्याचे प्रतीक मानला जातो. या खास प्रसंगगासाठी साडी निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवू शकता. (10 Orange Color Paithani For Shiv Jayanti)2 / 10शिव जयंती म्हटलं की पहिली पसंती ऑरेंज रंगाच्या काठपदर साड्यांना असते तर मस्तानी स्टाईल नऊवारीसुद्धा महिलांमध्ये लोकप्रिय आहे. (Orange Color saree For Shiv Jayanti)3 / 10शिव जयंतीसाठी ऑरेंज रंगाची पैठणी हा अत्यंत वैशवशाली दिसते. त्यावर जर सोन्याचे जरीचे मोर, पोपट किंवा कमळाचे नक्षीकाम असेल तर ती साडी अधिकच उठावदार दिसते.4 / 10आजकाल महाराणी पैठणी किंवा पेशवाई पॅटर्न खूपच लोकप्रिय होत आहे. ज्यामध्ये पदरावर मोठी आणि नक्षीदार बॉर्डर असते जी शिवकालीन संस्कृतीची आठवण देते.5 / 10साडीचा काठ जर हिरव्या किंवा जांभळ्या रंगांचा असेल तर तो ऑरेंज रंगाला छान कॉन्ट्रास्ट देतो.6 / 10सोहळ्याच्या गर्दीत आणि मिरवणूकीत वावरण्यासाठी सेमी-पैठणी किंवा सॉफ्ट सिल्क सोयीअस्कर पडते. कारण त्या वजनाला हलक्या असतात.7 / 10या पैठणीवर तुम्ही ठुशी नथ आणि कपाळावर चंद्रकोर लावली तर तुमचा पेहराव पूर्णपणे मराठमोळा आणि तेजस्वी दिसेल.8 / 10ऑरेंज साडीत तुम्हाला मुनिया पैठणी, चंद्रकोर पैठणी, नारायण पेठ असे बरेच पर्याय तुम्हाला मिळतील.9 / 10जर तुम्हाला थोडा ट्रेंडी पण पारंपारीक लूक हवा असेल तर ऑरेंज खण साडी निवडा. या साडीचा पोत थोडा वेगळा असतो आणि त्यावर छोट्या छोट्या डिझाईन्स खूपच मोहक दिसतात. यावर कॉन्ट्रास्ट रंगाचे खणाचेच ब्लाऊज खूपच उठून दिसतात.10 / 10भरजरी लूक हवा असेल तर ऑरेंज रंगाची गडवाल किंवा कांजीवरम साडी उत्तम आहे. या साड्यांचे काठ मोठे आणि डिझाईन्स अतिशय सुबक असते. ज्यामुळे अगदी उठून दिसते.