1 / 10आजच्या काळात नोकरी करणाऱ्या पालकांनी आपल्या मुलांना पुरेसा वेळ देणे हे सर्वात मोठ अवघड आणि कठीण काम...ऑफिसच्या जबाबदाऱ्या, घरची कामे आणि धावपळीच्या आयुष्यात मुलांसोबत ' क्वालिटी टाइम' घालवण्यासाठी पुरेसा वेळच मिळतं नाही. याचा परिणाम हळूहळू नात्यांवर आणि मुलांच्या भावनिक विकासावर देखील होऊ शकतो(parenting tips for working parents).2 / 10मुलं मोठी होत असताना त्यांना केवळ महागड्या वस्तू किंवा चांगल्या शाळा, उत्तम शिक्षण एवढंच नको असतं, तर त्यांना हवा असतो आपल्या आई-बाबांचा थोडासा वेळ आणि सहवास....अनेकांना असं वाटतं की मुलांसोबत तासंतास बसणं, खेळणं, वेळ एकत्रित घालवणं म्हणजेच प्रेम, पण खरं पाहता...तुम्ही तुमच्या मुलांसोबत दिवसातून किती तास घालवता यापेक्षा तो वेळ एकत्रित कसा घालवता यालाच, खऱ्या अर्थाने 'क्वालिटी टाइम' म्हणतात.3 / 10मुलं आणि पालकांमधील नातं हे विश्वासाचं आणि संवादाचं असावं, कमी वेळातही मुलांच्या मनातील गोष्टी नेमक्या कशा ओळखायच्या आणि त्यांच्यासोबत एक घट्ट, आनंदी नातं कसं तयार करायचं? यासाठी ७ अत्यंत सोपे आणि परिणामकारक गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहूयात... 4 / 10 दिवसभरातून किमान १५ ते २० मिनिटे वेळ काढा, जो फक्त तुमच्या मुलांसाठी असेल. या वेळात मोबाईल आणि इतर कामांपासून दूर राहून पूर्णपणे मुलांकडे लक्ष द्या. अगदी दररोजचा थोडा वेळ देखील मुलांसाठी खूप मोलाचा ठरतो.5 / 10 मुलांशी दररोज संवाद साधणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांचा दिवस कसा गेला, शाळेत त्यांनी नवीन काय शिकले, हे त्यांना आवर्जून विचारा. यामुळे मुलाला आपण महत्त्वाचे आहोत असे वाटते आणि त्याचे तुमच्यासोबतचे नाते अधिक घट्ट होते.6 / 10 मुलांसोबत खेळणे किंवा एखादी ॲक्टिव्हिटी एकत्रित बसून केल्याने नात्याला अधिक मजबुती येते. मग ते बैठे खेळ असोत, चित्रकला असो किंवा छोटीशी आउटडोअर ॲक्टिव्हिटी; हे क्षण मुलांसाठी कायमस्वरूपी मनात आठवणी तयार करतात. 7 / 10 जर तुम्ही कामाच्या निमित्ताने मुलांपासून दूर असाल, तर व्हिडिओ कॉल किंवा व्हॉईस मेसेजच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्कात राहा. तुम्ही प्रत्यक्षात जवळ नसलात तरीही, या लहानशा प्रयत्नामुळे मुलाला तुमच्या अस्तित्वाची आणि प्रेमाची जाणीव होत राहते.8 / 10 दिवसभरातून किमान एक वेळ अशी नक्की करा, जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र बसून जेवण करेल. संवाद साधण्यासाठी आणि एकमेकांशी नाते घट्ट करण्यासाठी ही वेळ सर्वात उत्तम असते.9 / 10 वीकेंडला मुलांसोबत बाहेर फिरायला जाणे, एखादा चित्रपट पाहणे किंवा घरीच काहीतरी खास प्लॅन करण्याचा प्रयत्न करा. यामुळे मुलाला तुमच्या सहवासाचा अधिक आनंद मिळतो.10 / 10 कधीतरी मुलांच्या आवडीनुसार दिवसाचे नियोजन करा. यामुळे त्यांच्या मतांना आणि इच्छांना महत्त्व दिले जात आहे, असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण होतो.