शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Navratri Colors 2025 : पाहा नवरात्रीचे ९ रंग, कोणत्या दिवशी कोणता रंग-कोणत्या रंगाची नेसाल साडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2025 13:58 IST

1 / 10
पक्ष पंधरवाडा संपत आला की नवरात्रोत्सव सुरू होतो. देवीची आराधना, गरबा, दांडिया याशिवाय नवरात्रीमध्ये आणखी उत्साह वाढविणारी एक गोष्ट असते ती म्हणजे नवरात्रीचे रंग.. याचा महिलांमध्ये प्रचंड उत्साह असतो आणि त्यानिमित्ताने प्रत्येक रंगाची साडी एकेकदा नेसून होते, याचा आनंदही असतो.
2 / 10
म्हणूनच आता नवरात्रीच्या कोणत्या माळेला कुठल्या रंगाची साडी नेसायची ते पटकन पाहून घ्या.. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा म्हणजेच २२ सप्टेंबरचा रंग आहे पांढरा.
3 / 10
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीचा रंग आहे लाल. छान लालबुंद रंगाची साडी नेसून यादिवशी तयार व्हा.
4 / 10
२४ सप्टेंबर रोजी येणाऱ्या तिसऱ्या माळेचा रंग आहे निळा. शांतता, अथांगता यांचं प्रतिक असणारा निळा रंग अनेकींचा आवडीचा असतोच...
5 / 10
चौथ्या माळेचा रंग आहे पिवळा.. पिवळा रंग म्हणजे तेजाचं प्रतिक..
6 / 10
समृद्धी, संपन्नता यांचं प्रतिक म्हणजे हिरवा रंग. तुमच्याकडे असणारी हिरवीसाडी नवरात्रीच्या पाचव्या माळेला म्हणजेच २६ सप्टेंबरला नेसण्यासाठी तयार ठेवा.
7 / 10
नवरात्रीच्या सहाव्या दिवसाचा रंग आहे ग्रे किंवा करडा. एरवी करड्या रंगाची साडी अनेकींंना आवडत नाही. पण नवरात्रीच्या निमित्ताने मात्र ती अनेकजणी हौशीने घेतात आणि नेसतात.
8 / 10
करड्या रंगानंतर नंबर येणार आहेत तो केशरी रंगाच्या साडीचा. लाल आणि केशरी या दोन रंगांमध्ये गल्लत करू नका. तुमच्याकडे केशरी रंगाची साडी नसेल तर ती आताच घेऊन टाका.
9 / 10
बहुतेक जणींच्या आवडीचा मोरपंखी रंग येतो नवरात्रीच्या आठव्या माळेला म्हणजेच २९ सप्टेंबरला..
10 / 10
गुलाबी रंगाची साडी शेवटच्या दिवशीसाठी राखून ठेवा. यंदा नवरात्रीच्या नवव्या माळेचा रंग आहे गुलाबी..
टॅग्स :Navratri Mahotsav 2025शारदीय नवरात्रोत्सव २०२५Garba Cornerनवरात्री गरबा २०२४Navratriनवरात्री