By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 20:26 IST
1 / 10मार्गशीर्ष (Margashirsha) महिना हा हिंदू धर्मात पवित्र आणि शुभ मानला जातो. विशषत:महालक्ष्मी देवीच्या पुजेसाठी. या महिन्याच्या गुरूवारी देवीची पूजा करून महिला उपवासही करतात. (Margashirsha Guruvar Special Rangoli Designs)2 / 10 या महिन्यात प्रत्येक गुरूवारी महालक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते आणि घरासमोर सुंदर रांगोळ्या काढल्या जातात.3 / 10या सुंदर रांगोळ्या लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी काढल्या जातात.4 / 10या रांगोळ्यांमध्ये प्रामुख्यानं कमळ, कलश, स्वातिस्क, शंख,दिवा यांसारख्या शुभ चिन्हांचा वापर केला जातो.5 / 10 या रांगोळ्या काढताना लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी अशा तेजस्वी, आकर्षक रंगांचा वापर केला जातो.6 / 10रांगोळीत फुलं, दिवे, तुळशीचे पान ठेवून तुम्ही तुम्ही ती अधिक सुशोभित करू शकता.7 / 10या विशेष रांगोळ्या घरात सकारात्मकता, समृद्धी आणि आनंदाचे वातावरण निर्माण करतात.8 / 10काही लोक बॉर्डर रांगोळी देखील काढतात ती घराच्या प्रवेशद्वाराला आकर्षक रूप देते. 9 / 10रांगोळी काढण्यापूर्वी ती जागा स्वच्छ करून, पाणी शिंपडून घ्या. ज्यामुळे रांगोळी अधिक आकर्षक दिसेल.10 / 10या महिन्यात चार किंवा पाच गुरूवार येतात तुम्ही प्रत्येक गुरूवारी वेगवेगळ्या थीमची रांगोळी काढू शकता. या रांगोळ्या केवळ सजावट नसून त्या घरातील महिलांचे कलाप्रेम आणि श्रद्धा व्यक्त करण्याचे माध्यम आहेत.