काळे मणी हातात घालण्याची नवी फॅशन, मंगळसुत्र ब्रेसलेटच्या १० डिजाइन्स- शोभून दिसेल हातात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 17:51 IST
1 / 9आजकाल अनेक विवाहीत स्त्रिया गळ्यात मंगळसुत्र न घालता काळेमणी वेगवेगळ्या पद्धतीनं परीधान करतात. जसं की हातात काळे मणी घालण्याची फॅशन प्रचलित आहे.(10 Beautiful Designs Of Mangalsutra bracelet )2 / 9मंगळसूत्र ब्रेसलेट हा पारंपरिक अर्थ जपून आधुनिक फॅशनशी (Fashion) जुळवून घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे.3 / 9मंगळसूत्र ब्रेसलेटच्या डिझाईन्समध्ये सध्या खूप वैविध्य पाहायला मिळत आहे, ज्यामुळे स्त्रियांना त्यांच्या आवडीनुसार निवड करणे सोपे झाले आहे.4 / 9नाजूक आणि बारीक साखळीवर काळे मणी आणि मध्यभागी छोटेसे डायमंड किंवा सोन्याचे पेंडंट (Pendant) असलेले ब्रेसलेट्स रोजच्या वापरासाठी खूप पसंत केले जात आहेत. 5 / 9या डिझाईन्समध्ये सोन्याची साखळी (Gold Chain) आणि काळे मणी (Black Beads) यांचे सुंदर मिश्रण असते.6 / 9हे ब्रेसलेट्स मनगटाची शोभा वाढवत नाही. तर महिलांना त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रतीक रोजच्या स्टाईलमध्ये सहजपणे समाविष्ट करण्याची संधी देतात.7 / 9मंगळसूत्र ब्रेसलेटची किंमत अनेक घटकांवर अवलंबून असते. पारंपरिक मंगळसूत्राच्या तुलनेत हे ब्रेसलेट्स वजनाने हलके आणि कमी लांबीचे असल्यामुळे त्यांची किंमत कमी असण्याची शक्यता असते.8 / 9हे ब्रेसलेट्स आकाराने लहान आणि वजनाने हलके असल्यामुळे रोजच्या कामात कोणताही अडथळा आणत नाहीत.9 / 9आजच्या फॅशनला अनुसरून हे ब्रेसलेट्स वेस्टर्न तसेच पारंपरिक अशा दोन्ही प्रकारच्या ड्रेसिंगवर सहज मॅच होतात.