शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5

    Maharashtra Day 2026 : मराठी साजश्रृंगारात शोभून दिसते खास बुगडी आणि कुडी, पाहा पारंपरिक मराठी दागिने

    By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2026 21:20 IST

    1 / 7
    महाराष्ट्रातील पारंपरिक दागिन्यांमध्ये कानातील दागिन्यांना खूप महत्त्व आहे. कुड्या, बुगडी, झुबे यांसारखे दागिने केवळ सौंदर्य वाढवत नाहीत, तर संस्कृती आणि परंपरा जपतात.
    2 / 7
    १. कुड्या (Kudya) – कुड्या हे छोटे, गोलाकार आणि कानाला घट्ट बसणारे असतात. सहसा सोन्याच्या बनवलेल्या या कुड्या रोजच्या वापरासाठी योग्य असतात. साध्या डिझाइनपासून ते नक्षीकाम केलेल्या कुड्यांपर्यंत अनेक प्रकार दिसतात.
    3 / 7
    २. बुगडी (Bugadi) – बुगडी हा महाराष्ट्रातील अतिशय खास दागिना आहे जो कानाच्या वरच्या भागात घातला जातो. त्याची वळणदार रचना आणि मोत्यांची किंवा सोन्याची सजावट यामुळे तो खूप आकर्षक दिसतो. नववधूंच्या साजशृंगारात बुगडीला विशेष स्थान आहे.
    4 / 7
    ३. झुबे(zhuba) – झुबे म्हणजे लोंबत्या प्रकारचे कानातले दागिने. हे आपल्या हालचालीसोबत हलतात आणि खूप मोहक दिसतात. लग्न, सण किंवा विशेष प्रसंगी झुबे घालण्याची परंपरा आहे.
    5 / 7
    ४. कर्णफुले (Karnphool) – कर्णफुले हे फुलाच्या आकाराचे मोठे आणि उठावदार कानातले असतात. सहसा सोन्याचे बनवलेले आणि नक्षीकाम केलेले हे दागिने सण-समारंभात किंवा लग्नात घातले जातात. कानाला पूर्ण झाकणारा त्यांचा आकार खूप आकर्षक दिसतो. तसेच त्यावर शक्यतो फुलांचेच डिझाइन असते.
    6 / 7
    ५. कान (Kaan) – कान हा प्रकार नावाप्रमाणेच संपूर्ण कान झाकणारा किंवा कानाच्या आकाराला बसणारा दागिना असतो. यामध्ये नाजूक नक्षीकाम, मोती किंवा रत्ने लावलेली असतात. विशेषतः लग्नसमारंभात किंवा पारंपरिक पेहरावात हा दागिना खूप उठून दिसतो आणि राणीच्या थाटाचा लूक देतो.
    7 / 7
    ६. वेल (Vel / Ear Chain) – वेल हा कानातल्या दागिन्याला केसांशी जोडणारा साखळीसारखा दागिना असतो. तो सहसा झुबे किंवा मोठ्या कानातल्यांसोबत वापरला जातो. यामुळे दागिना अधिक सुरक्षित राहतो आणि एकंदर साजशृंगार अधिक देखणा दिसतो.
    टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिनMaharashtraमहाराष्ट्रcultureसांस्कृतिकShoppingखरेदीTraditional Ritualsपारंपारिक विधीWomenमहिलाjewelleryदागिने