शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

नव्या नवरीसाठी डबल चेन मंगळसूत्राच्या खास नाजूक डिझाइन्स! आकर्षक पॅटर्न, गळ्यात शोभणारा सुंदर दागिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2026 19:00 IST

1 / 7
लग्न झाल्यानंतर अनेकदा मोठं मंगळसूत्र आपल्याला गळ्यात घालावं लागतं. पण ऑफिस किंवा लांबच्या प्रवासात इतकं मोठं मंगळसूत्र घालणं म्हणजे एक प्रकारची भीती वाटते. जर आपल्यालाही रोज लांबलचक मंगळसूत्र घालायचे नसेल आणि वर्किंग वूमन असू तर मंगळसूत्राच्या या सिंपल डिझाईन्स आपण वापरु शकतो. अगदी कमी किमतीत आणि लाईट वेट डबल चेन मंगळसूत्राच्या सिंपल डिझाइन्स आहेत. (double chain mangalsutra)
2 / 7
डबल चेन मंगळसूत्राच्या काही युनिक आणि सिंपल डिझाईन्स पाहूया. ज्या नव्या नवरीच्या सौंदर्यात अधिक भर घालतील. (new bride mangalsutra design)
3 / 7
झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका वीण दोघातली ही तुटेना मधील स्वानंदीने डबल चेन मंगळसूत्र घातलं होते. हे मंगळसूत्र दोन पदरी असून त्याला हिऱ्यांची दोन वेगवेगळी पेंडंट आहे. पेंडंच्या एका बाजूला काळे मणी आणि दुसऱ्या बाजूला फक्त सोन्याची चेन आहे.
4 / 7
हल्ली डबल चेन मंगळसूत्रामध्ये काळे मणी आणि सोन्याचे मणी पाहायला मिळतात. मध्यभागी दोन चेन असून एकात सोन्याचा मणी तर दुसऱ्या डायमंडची डिझाइन पाहायला मिळते.
5 / 7
या मंगळसूत्रात आपल्याला दोन चेन पाहायला मिळतील. त्यात काळे मणी आणि चेन असेल. एकात छोटा डायमंड आणि दुसऱ्यात गोलाकारमध्ये डायमंड पाहायला मिळेल.
6 / 7
डबल चेन मंगळसूत्राची क्रेझ सध्या पाहायला मिळत आहे. यात आपण एक सिंगल सोन्याची चेन त्यानंतर मध्यभागी दोन चेनचा पॅटर्न निवडू शकतो. यात सोन्याचा मणी आणि नावाचे लेटर अशी डिझाइन्सही मिळते.
7 / 7
मंगळसूत्रामध्ये काळेमणी आणि दोन सोन्याची चेन. एकात छोटा सोन्याचा मणी तर मध्यभागी डायमंड पानाची डिझाइन पाहायला मिळेल.
टॅग्स :fashionफॅशनWomenमहिला