1 / 7उन्हाळ्यात साडी नेसणं नकोसं वाटतं. त्यातही तेच पारंपरिक आणि जुन्या पद्धतीचे ब्लाऊज घातले की आपला लूक एकदम काकूबाईसारखा वाटू लागतो. उन्हाळ्यात स्टाईलसोबत कम्फर्ट जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अशा वेळी नेहमीच्या स्लिव्हलेस ब्लाऊजला एक जबरदस्त पर्याय म्हणून 'कॉटन हॉल्टर नेक ब्लाऊज' सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत.(Halter neck blouse)2 / 7आपणही ऑफिसला जाणार असू किंवा एखाद्या पार्टीला, हॉल्टर नेक डिझाइन आपल्याला मॉर्डन आणि कूल लूक देईल. या उन्हाळ्यात स्वतःला 'कूल आणि स्टायलिश' ठेवण्यासाठी कॉटन हॉल्टर नेकचे ५ हटके पर्याय पाहूया.(Cotton blouse designs)3 / 7आपण साधी साडी नेसणार असून तर त्यावर कलामकारी किंवा ब्लॉक प्रिंट असलेला हॉल्टर नेक ब्लाऊज अतिशय उठून दिसतो. हा ब्लाऊज गळ्याभोवती बंद असतो, त्यामुळे ज्वेलरी घालण्याची गरज नाही. 4 / 7स्ट्रॅप स्टाइल हॉल्टर नेक चांगला पर्याय आहे. हे दिसायला अतिशय बोल्ड आणि ट्रेंडी वाटतं. उन्हाळ्यात ओपन एअर पार्टीसाठी हा चांगला पर्याय आहे. 5 / 7ऑफिसवेअर किंवा प्रोफेशनल लुकसाठी हाय नेक कॉलर असलेला हॉल्टर नेक ब्लाऊज निवडा. कॉटन साडीसोबत हा ब्लाऊज घातल्यास गर्दीत उठून दिसाल. 6 / 7बो-टाय हॉल्टर नेक दिसायला खूप क्यूट आणि स्टायलिश वाटतं. तरुण मुलींमध्ये आणि मॉडर्न स्त्रियांमध्ये ही डिझाइन सध्या खूप लोकप्रिय आहे.7 / 7सणासुदीला किंवा लग्नसमारंभात जायचे असेल तर एम्ब्रॉयडरी असलेला हॉल्टर नेक ब्लाऊज शिवा. यामुळे आपल्याला जास्त जड दागिने न घालताही हेवी लूक मिळतो.