शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

करिना कपूर ते खुशी कपूर... आयुष्यातल्या महत्त्वाच्या क्षणी आईचे- सासूचे कपडे घालणाऱ्या ६ सेलिब्रिटी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2023 17:23 IST

1 / 8
'द आर्चिज' च्या माध्यमातून श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लेक खुशी कपूर हिने चंदेरी दुनियेत पदार्पण केले. त्यानिमित्त झालेला प्रिमियर हा खुशीच्या आयुष्यातला एक अतिशय महत्त्वाचा क्षण होता. म्हणूनच या खास दिवशी खुशीने तिच्या आईचा म्हणजेच श्रीदेवीचा गोल्डन सेक्विन गाऊन घातला होता.
2 / 8
तसेच या ड्रेसवर खुशीने घातलेला नेकलेसही श्रीदेवीच्या विंटेज कलेक्शनमधला होता. आयुष्यातल्या अशा अतिमहत्त्वाच्या क्षणांसाठी तिच्याप्रमाणेच इतर सेलिब्रिटींनीही त्यांच्या आईचे, सासूचे कपडे, दागिने घातले होते. त्या नेमक्या कोण ते पाहा..
3 / 8
अभिनेत्री करिना कपूर हिने तिच्या लग्नात जो लेहेंगा घातला होता, तो तिच्या सासुबाईंचा म्हणजेच शर्मिला टागोर यांचा होता. शर्मिला टागोर यांनी त्यांच्या विवाहप्रसंगी तो लेहेंगा घातला होता.
4 / 8
अभिनेत्री सोनम कपूर हिने तिच्या लग्नात जे काही दागिने घातले होते, ते सगळे तिच्या आईचे होते. तिच्या आईने ते लग्नात घातले होते.
5 / 8
प्रियांका चोप्राच्या या ड्रेसवरची जी लांबसडक ओढणी आहे, ती ओढणी निक जोनासच्या आईच्या म्हणजेच प्रियांकाच्या सासूची आहे. ती तिच्या सासूने तिच्या लग्नात घेतली होती.
6 / 8
नीता अंबानी यांची लेक इशा अंबानी हिने तिच्या लग्नात जी लाल रंगाची ओढणी घेतली होती, ती ओढणी निता अंबानी यांच्या लग्नाच्या साडीमधून तयार करण्यात आली होती. अबू जानी आणि संदीप खाेसला या सेलिब्रिटी डिझायनरकडून ती खास डिझाईन करून घेण्यात आली होती.
7 / 8
भारताची स्टार टेनिसपटू हिनेही स्वत:च्या लग्नात नेसण्यासाठी तिच्या आईच्या लग्नातल्या साडीची निवड केली होती.
8 / 8
अभिनेत्री यामी गौतम हिने लग्नात नेसलेली लाल रंगाची बनारसी साडी तिच्या आईची लग्नाची साडी होती.
टॅग्स :fashionफॅशनKareena Kapoorकरिना कपूरKhushi Kapoorखुशी कपूरSrideviश्रीदेवीYami Gautamयामी गौतमnita ambaniनीता अंबानीSonam Kapoorसोनम कपूर