संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 19:01 IST
1 / 8संत्री आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. संत्र्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्वचा निरोगी राहते आणि पचनास मदत होते. त्यात व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.2 / 8संत्र्यामध्ये असलेले पोषक घटक ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत करतात. त्यात फायबर असल्याने पोट भरल्यासारखं वाटतं आणि वजन कमी करण्यास मदत होते.3 / 8लोक अनेकदा संत्र्याच्या साली खाल्ल्यानंतर फेकून देतात. संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे तुमच्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी फायदेशीर असतात. संत्र्याच्या सालींचा कसा वापर करायचा जाणून घेऊया...4 / 8संत्र्याच्या साली त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. संत्र्याच्या साली वाळवा, त्याची पावडर बनवा आणि नंतर गुलाबपाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि तुमच्या चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येईल.5 / 8संत्र्याच्या सालीची पावडर बनवा, त्यात पाणी घाला आणि किडे किंवा इतर कीटकांना दूर ठेवण्यासाठी ते पाणी घरात शिंपडा.6 / 8तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही दुर्गंधी दूर करण्यासाठी संत्र्याच्या सालीचा वापर करू शकता. साली वाळवा आणि तुमच्या खोलीत एका कपड्यात बांधून ठेवा. असं केल्याने त्याचा सुगंध घरभर पसरेल.7 / 8संत्र्याच्या साली केसांची चमक वाढवण्यास देखील मदत करतात. यामुळे कोंडा कमी होतो आणि तुमचे केस खूप मऊ होतात.8 / 8तुम्ही संत्र्याच्या सालीचा वापर नॅचरल क्लिनर म्हणून देखील करू शकता. हे तुमचं घर स्वच्छ करण्यासाठी एक उत्तम नॅचरल क्लिनर आहेत. साली फेकून देण्याऐवजी तुम्ही त्यांचा अशा प्रकारे वापर करू शकता.