शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरफड लावण्याची एकच पद्धत माहिती असेल तर घ्या ७ आयडिया, चेहरा-केसांसाठी नॅचरल टॉनिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2025 20:01 IST

1 / 8
त्वचेसाठी, केसांसाठी कोरफडीचा गर अतिशय उत्तम असतो, हे आपल्याला माहितीच आहे. पण त्याचा वापर नेमका कसा करावा ते समजत नाही. म्हणूनच या काही टिप्स..
2 / 8
पुढे सांगितलेल्या वेगवेगळ्या पद्धतीनुसार तुम्ही कोरफड वापरली तर केस, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी इतर कोणतेच कॉस्मेटिक्स वापरण्याची गरज पडणार नाही.
3 / 8
जर भुवया पातळ असतील तर कोरफडीच्या पानांमधला ताजा गर आयब्रो ब्रशवर लावा आणि तो भुवयांवर फिरवून मसाज करा. भुवया दाट होतील.
4 / 8
कोरफडीचे पान मधोमध कापा आणि त्यावर थोडी हळद टाका. आता हा तुकडा काखेत फिरवा. ज्या लोकांना खूप घाम येतो, काखेमध्ये काळेपणा आलेला असेल किंवा अंगाला नेहमीच घामाची खूप दुर्गंधी येत असेल तर ती या उपायामुळे कमी होऊ शकते.
5 / 8
कोरफड वाळवून घ्या आणि त्याची पावडर करा. आता ही पावडर टुथब्रशला लावून त्याने ब्रश करा. हा उपाय केल्यामुळे दातांचा पिवळेपणा कमी होतो. तसेच हिरड्याही मजबूत होतात.
6 / 8
खोबरेल तेलामध्ये कोरफडीचा गर घालून ते उकळून घ्या. हे तेल केसांना लावा आणि अर्ध्या तासाने केस धुवून टाका. केसांचा कोरडेपणा जाऊन ते मऊ, सिल्की आणि चमकदार होतात.
7 / 8
कोरफडीचा गर लिपस्टिकच्या रिकाम्या बाटलीमध्ये घाला आणि फ्रिजमध्ये ठेवून तो घट्ट करून घ्या. आता ही स्टिक दररोज डोळ्यांभोवती फिरवा. डार्क सर्कल्स कमी होतील.
8 / 8
कोरफडीचं पान मधोमध कापा. त्यावर थोडी साखर आणि थोडी कॉफी पावडर घाला. आता हे पान तुमच्या चेहऱ्यावर चोळा. यामुळे टॅनिंग, डेडस्किन जाऊन त्वचा चमकदार होते.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीHome remedyहोम रेमेडीHair Care Tipsकेसांची काळजी