शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मंगळागौर स्पेशल : मंगळागौरीसाठी नऊवारी नेसायची तर ‘या’ पॅटर्नचं शिवा ब्लाऊज, घरंदाज शालीन दिसाल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2025 16:14 IST

1 / 8
श्रावणातले (Shravan special) मुख्य आकर्षण म्हणजे मंगळागौरीचा सण (mangalagauri). नववधू हा सण मोठ्या हौशीने साजरा करतात. अगदी थाटात हा सोहळा साजरा केला जातो. त्यामुळे मंगळागौरीसाठी अनेकजणी पारंपरिक नऊवारी साडी नेसण्यास प्राधान्य देतात.
2 / 8
आता नऊवारी साडी नेसणार म्हटल्यावर तुमचा लूक पारंपरिक मराठी धाटणीचाच यायला हवा. त्यासाठी ब्लाऊज थोडं काळजीपुर्वक शिवायला हवं. म्हणूनच अस्सल मराठी लूक देणारं आणि तुमच्या मराठी सौंदर्याला चार चाँद लावणारं ब्लाऊज कसं असायला हवं ते पाहा..
3 / 8
अशा पद्धतीचं बंद गळ्याचं ब्लाऊज आपल्याकडे पुर्वी घातलं जायचं. नऊवारीवर पारंपरिक लूक हवा तर हे ब्लाऊज अगदी परफेक्ट आहे.
4 / 8
खणाचं ब्लाऊज नऊवारीवर विशेष भाव खाऊन जातं. त्यामुळे शक्यतो खणाचं ब्लाऊज घालण्याचा प्रयत्न करा.
5 / 8
पुढून आणि मागून दोन्ही बाजुनी अशा पद्धतीने तुम्ही बंद गळ्याचं ब्लाऊज शिवू शकता. या पद्धतीचे एखादं ब्लाऊज आपल्या कलेक्शनमध्ये असायला हरकत नाही.
6 / 8
वेलवेटच्या ब्लाऊजचा ट्रेण्ड आता आला आहे. त्यामुळे असं लांब बाह्यांचं ब्लाऊज शिवलं तर तुमचा लूक छान खुलून येईल.
7 / 8
बंद गळ्याचं पण थोडा मॉडर्न लूक असणारं ट्रेण्डी ब्लाऊज पाहिजे असेल तर अशा पद्धतीचं डिझाईन तुम्ही निवडू शकता.
8 / 8
नऊवारीवर टिपिकल मराठी पद्धतीचं ब्लाऊज शिवायचं असेल तर दोन गोष्टी हमखास लक्षात ठेवा. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ब्लाऊज बंद गळ्याचं असावं आणि ब्लाऊजच्या बाह्या अगदी हाताच्या कोपऱ्यापर्यंत न घेता या पद्धतीने काेपऱ्यापासून एखादा इंच वर असाव्या. हे छोटेसे बदल तुमच्या लूकमध्ये कमालीचा बदल घडवून आणू शकतात.
टॅग्स :fashionफॅशनShravan Specialश्रावण स्पेशलsaree drapingसाडी नेसणेStyling Tipsस्टायलिंग टिप्स