शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चेहरा-पाठीवरची चामखीळ कमी होणारा सोपा उपाय-नारळाच्या तेलात ५ गोष्टी मिसळून लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2025 10:37 IST

1 / 7
त्वचेवर चामखीळ असणं म्हणजे चेहऱ्यावर एक प्रकारचा डाग. चामखीळमुळे चेहऱ्यावरील सौंदर्य काही प्रमाणात कमी होत जाते. इतकेच नाही तर हे हळूहळू वाढत जाते आणि चेहरा घाण दिसू लागतो. (natural acne treatment)
2 / 7
चामखीळ हे मान, चेहरा आणि पाठीवर अधिक प्रमाणात दिसतात. याचे डाग देखील लवकर निघत नाही. अशावेळी नारळाचे तेल खूप फायदेशीर ठरु शकते. चामखीळ काढण्यासाठी काही रासायनिक उत्पादनांचा वापर करण्याऐवजी आपण नारळाच्या तेलात काही पदार्थ मिसळून लावल्यास ते सहज निघेल.
3 / 7
चेहऱ्यावरील चामखीळ काढण्यासाठी नारळाचे तेल आणि लसूण वापरु शकतो. त्यासाठी आपल्याला ३-४ लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट तयार करुन त्यात नारळाच्या तेलात घाला. ही पेस्ट चामखीळवर लावून रात्रभर पट्टीने बांधून ठेवा. हा उपाय केल्याने त्रास कमी होईल.
4 / 7
सफरचंद सायडर व्हिनेगर आणि नारळाचे तेल चामखीळ काढण्यास मदत करेल. यासाठी २ चमचे तेल आणि व्हिनेगर घेऊन याचे मिश्रण चामखीळवर लावा. रात्रभर राहू द्या. हा उपाय आठवड्यातून एकदा केल्यास फायदा होईल.
5 / 7
चेहऱ्यावरील चामखीळ काढण्यासाठी बेकिंग सोडा आणि नारळाच्या तेलाची पेस्ट लावा. अर्ध्या तासाने त्वचा पाण्याने स्वच्छ करा.
6 / 7
नारळाच्या तेलात लिंबाच्या पावडरचे मिश्रण घालून पेस्ट तयार करा. चामखीळच्या जागी लावून अर्ध्या तासाने कोमट पाण्याने धुवा. हा उपाय आठवड्यातून एकदा केल्याने फरक जाणवेल.
7 / 7
नारळाचे तेल आणि टी ट्री ऑइल चामखीळवर लावल्यास फायदा होतो. हे तेल मिक्स करुन लावला, रात्रभर तसेच राहू द्या. दिवसातून दोन वेळा हा उपाय केल्याने चामखीळ निघून जाईल.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी