1 / 6ऋतू कोणताही असला तरी घरभर झुरळ आणि मुंग्या कायम पाहायला मिळतात. किचनचा कट्टा, सिंक किंवा बाथरुममध्ये झुरळ कायम फिरत असतात. किचनमधल्या पदार्थांवर आणि भाज्यांवर ते फिरताना दिसतात. ज्यामुळे आपल्या आरोग्याच्या समस्या देखील तितक्याच वाढतात. (cockroach control)2 / 6स्वयंपाकघरात स्वच्छता राखणं देखील तितकंच महत्त्वाच आहे. घाणेरड्यापणामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढतो. झुरळ केवळ घरात घाण पसरवत नाही तर अनेक आजार देखील पसरवतात. यांना घरातून पळवून लावण्यासाठी आपण अनेक महागडे स्प्रे किंवा केमिकल्सचा वापर करतो पण याचा काही फायदा होत नाही. पण अशावेळी काही घरगुती टिप्स केल्या तर झुरळ कायमचे पळून जातील. (natural ways to kill cockroaches)3 / 6आपल्याला एक लिटर पाण्यात चार चमचे बोरॅक्स पावडर घालून ते चांगले मिसळवावे लागेल. या द्रावणात दोन चमचे मीठ किंवा लिंबाचा रस घाला आणि पाच मिनिटे तसेच राहू द्या. नंतर एका स्प्रे बाटलीत भरा आणि जिथे झुरळ दिसतील तिथे फवारणी मारा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा असं केल्याने झुरळे नाहीसे होतील. 4 / 6बेकिंग पावडरमध्ये साखर मिसळा. आणि हे झुरळ जिथे असतील तिथे शिंपडा. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा असं केल्याने काही दिवसांत झुरळ पळून जातील. 5 / 6स्वयंपाकघरात किंवा घरातील कानाकोपऱ्यात लवंग ठेवा. यामुळे झुरळांपासून आपला बचाव होईल. याच्या वासाने झुरळ घराबाहेर निघून जातील. 6 / 6पुदिन्याचे तेल किंवा त्याच्या पानांच्या वासाने झुरळे घरात येत नाही. तसेच ते घरभर फिरणार देखील नाही.