ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
1 / 7घराची अगदी रोजच्या रोज स्वच्छता केली तरी रोज धूळ होतेच. एक दिवस पुसलं नाही तरी घरातलं फर्निचर लगेच धुळीने माखलेलं दिसू लागतं.2 / 7म्हणूनच आता हा एक खास उपाय करा. यामुळे तुमच्या घरातून धूळ गायब होईल. घरातलं फर्निचर आणि फरशा आठवड्यातून दोन वेळा तरी या खास पद्धतीने पुसून काढा. यामुळे फर्निचर खरोखरच स्वच्छ, चकचकीत दिसेल आणि रोजच्या रोज स्वच्छ करण्याची गरज राहणार नाही. 3 / 7पावसाळ्याच्या दिवसांत चिलटं आणि झुरळं यांचे प्रमाणही खूप वाढते. कारण घरात अनेक ठिकाणी ओल असते. हा उपाय जर तुम्ही नियमितपणे केलात तर चिलटं आणि झुरळांचं प्रमाण कमी व्हायलाही मदत होईल.4 / 7हा उपाय करण्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये २ कप पाणी आणि पाव कप व्हिनेगर घ्या.5 / 7त्याच मिश्रणामध्ये १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल घाला. ऑलिव्ह ऑईलमुळे घरातल्या फर्निचरला छान चमक येते आणि त्याचे ओलसरपणापासून संरक्षण होते.6 / 7यानंतर या मिश्रणामध्ये २ ते ४ थेंब डिशवाॅश लिक्विडही घाला. यामुळे घर चकाचक होण्यास मदत होते.7 / 7आता या मिश्रणाने घरातलं फर्निचर पुसून काढा. घरात लवकर धूळ होणार नाही.