शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या चुकांमुळे वैतागलात? न रागावता 'हा' प्रयोग करा; आपोआप बदलतील- गुणी होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2024 09:10 IST

1 / 7
काही अपवाद सोडले तर बहुतांश पालकांना हा अनुभव नेहमीच येतो. मुलं दरवेळी वेगवेगळी चूक करतात आणि पालकांची बोलणी खातात.
2 / 7
पण वारंवार बोलूनही मुलं काही सुधरत नाहीत. पुन्हा ज्या चुका करायच्या त्या करतातच. अशावेळी त्यांच्यावर आणखी जास्त चिडू नका. उलट न रागावता एक प्रयोग करून बघा.
3 / 7
हा प्रयोग बीके शिवानी यांनी सुचवला आहे. हा प्रयोग पालकांनी काही दिवस केल्यास मुलं आपोआप सुधरतील तुम्हाला त्यांना रागवण्याची गरजही पडणार नाही, त्यांच्या चुका ते सुधारून घेतील, असं त्या सांगतात.
4 / 7
बीके शिवानी सांगतात की मुलं जेव्हा एखादी चूक करून तुमच्यासमोर येतील तेव्हा त्यांना त्याबद्दल अजिबात रागावू नका. तुमचा राग नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा आणि मुलांशी इतर हलक्याफुलक्या विषयांवर गप्पा मारा.
5 / 7
त्यानंतर मुलांना त्यांच्यातल्या पॉझिटीव्ह गोष्टी सांगा. असं एकच दिवस नाही तर रोज करा. छोट्या छोट्या गोष्टीत त्यांचं कौतुक करा आणि ते कोणती गोष्ट किती चांगल्या पद्धतीने करत आहेत, हे त्यांना वारंवार सांगा.
6 / 7
'तू किती समजूतदार आहेस', 'तुला गोष्टींचं किती उत्तम भान आहे', 'तू किती जबाबदार आहेस' असं जर आपण सकारात्मक पद्धतीने मुलांना वारंवार बोलत गेलो, तर त्यांना आपोआप त्यांच्या जबाबदारीची जाणीव व्हायला लागते.
7 / 7
मग कोणतीही चुकीची गोष्ट करताना त्यांना तुम्ही केलेले कौतुकाचे शब्द आठवतात आणि बऱ्याच प्रमाणात त्यांच्या हातून चुका होण्याचे प्रमाण कमी कमी होत जाते. रागावून मुलांना सुधारण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा एकदा हा प्रेमाने सांगण्याचा सकारात्मक प्रयोग करून बघा आणि सांगा तुम्हाला नेमकं काय अनुभव आला....
टॅग्स :Parenting Tipsपालकत्वkidsलहान मुलं