शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात हाडांचं कुरकुरणं सुरू होण्याआधीच 'या' पद्धतीने मनुका खा! हाडांची दुखणी पळून जातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2025 17:19 IST

1 / 8
हिवाळ्याच्या दिवसांत सांधेदुखीचा त्रास खूप वाढतो. कारण या दिवसांत अंगातलं मॉईश्चर कमी होतं. त्याचा परिणाम स्नायू आणि जॉईंट्सवरही होतो.
2 / 8
त्यामुळे हिवाळ्यात पाय, कंबर, पाठ जास्त दुखते अशी तक्रार अनेकजण करतात. शिवाय ज्यांना आधी कधी हाडांवर मार लागलेला असतो, फ्रॅक्चर झालेलं असतं त्यांच हाडांचं जुनं दुखणंही या दिवसांत नव्याने सुरू होतं.
3 / 8
म्हणूनच हा त्रास कमी करायचा असेल तर मनुका खूप उपयोगी ठरतात. पण त्या योग्य पद्धतीने खाल्ल्या गेल्या पाहिजेत.
4 / 8
काळ्या मनुकांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असतं. हाडांच्या बळकटीसाठी हे दोन्ही घटक खूप महत्त्वाचे आहेत.
5 / 8
याशिवाय काळ्या मनुकांमधून लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम हे घटकही भरपूर प्रमाणात मिळतात.
6 / 8
काळ्या मनुक्यांमधल्या या गुणधर्माचा शरीराला पुरेपूर लाभ होण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापुर्वी मनुका स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर अर्धी वाटी पाण्यात ८ ते १० मनुका भिजत घाला.
7 / 8
दररोज सकाळी उपाशीपोटी भिजलेल्या मनुका बारीक चावून खा आणि मनुक्यांचं पाणी पिऊन घ्या.
8 / 8
हा उपाय केल्यामुळे हाडं तर बळकट होतातच, पण मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या वेदनाही कमी होतात, असं आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी एका इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये सांगितलं होतं.
टॅग्स :Healthआरोग्यWinter Foodहिवाळ्यातला आहारBack painपाठीचे दुखणे उपायHome remedyहोम रेमेडी