1 / 9काही जणींच्या केसांना अजिबातच वाढ नसते. काहीही केलं तरी त्यांचे केस वाढतच नाहीत. शिवाय केस गळण्यामुळेही त्या हैराण झालेल्या असतात.(home made powder for hair growth)2 / 9तुमच्या या दोन्ही समस्या अगदी झटपट सोडवायच्या असतील तर पुढील पद्धतीने घरच्याघरी एक पावडर तयार करा आणि रोज अगदी नियमितपणे खा.(how to control hair loss?)3 / 9यामुळे तुमच्या केसांना योग्य ते पौष्टिक घटक मिळतील आणि त्यामुळे केसांची चांगली वाढ होण्यास मदत होईल (home hacks for hair growth and long hair). तसेच केसांची मुळं पक्की होऊन त्यांचं गळणंही कमी होईल.(super food for hair growth)4 / 9ही पावडर तयार करण्यासाठी खोबऱ्याचा एक तुकडा घ्या. त्याचे बारीक बारीक काप करा. खोबऱ्यामध्ये व्हिटॅमिन ई, प्रोटीन्स यांच्यासोबतच केसांसाठी पौष्टिक ठरणारे घटक भरपूर प्रमाणात असतात. 5 / 9आता २ ते ३ चमचे भोपळ्याच्या बिया घ्या. भोपळ्याच्या बियांमध्ये असणारे काही घटक केसांच्या वाढीसाठी मदत करतात.6 / 9त्यात आता २ ते ३ चमचे पांढरे तीळ घाला. प्रोटीन्स, कॅल्शियम आणि गूड फॅट्स असणारे तीळ केसांवर चमक आणतात. केसांची मुळं पक्की करून केस गळणं कमी करण्यासाठी मदत करतात.7 / 9त्यानंतर त्यामध्ये १०० ग्रॅम आवळा पावडर आणि १०० ग्रॅम खडीसाखर घाला. आवळ्यामुळे केस कमी वयात काळे होण्याचं प्रमाण कमी होतं. 8 / 9आता हे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये घाला आणि त्याची अगदी बारीक पावडर करून घ्या. रोज रात्री किंवा सकाळी ही पावडर १ चमचा खा आणि त्यावर कोमट पाणी प्या. 9 / 9हे सगळे घटक केसांसाठी अतिशय पौष्टिक असल्याने केसांच्या वाढीवर त्यांचा नक्कीच खूप चांगला परिणाम दिसून येतो.